-
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीयविश्व विद्यालय एरंडोल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.
-

-
एरंडोल प्रतिनिधी – येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय एरंडोल 21 जून 2025 रोजी अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याच दिवशी भगवान शिवने आपल्या शिष्यांना योगाचे ज्ञान दिले होते. म्हणून भगवान शिव हेच योगाचे गुरु आहेत. हे आध्यात्मिक रहस्य 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मागेआहे. नियमित योग साधना केल्यामुळे शरीर निरोगी होते, मन शांत होते, बुद्धी सकारात्मक होते व चित्त चैतन्यमय आनंदमय होते. शरीराचे मनाचे स्वास्थ्य हवे असेल तर नियमित पणे योग साधना व योगासने केली पाहिजेत. नियमित योग योगासने केल्यामुळे विचार करण्याची शक्ती निर्णय घेण्याची शक्ती निरीक्षण शक्ती व स्मरण शक्ती वाढते. मन शांत स्थिर शुद्ध पवित्र व निर्मल बनते. आणि आनंदी जीवन जगण्यासाठी याच गोष्टीची गरज आहे. कलियुगामध्ये प्रत्येक माणसाला ताण तणाव अशांती समस्या भरपूर आहेत यातून जर मुक्ती हवी असेल तर प्रत्येकाने भगवान शिवने दिलेला राजयोग व राज योगाचा अभ्यास नियमित केला पाहिजे. त्यामुळे मनाचे संतुलन वाढते व तणावमुक्त संतुलित जीवन जगण्या साठी मदत होते. नियमित योग साधना केल्यामुळे सकारात्मक विचारसरणी तयार होते शरीरातील ऊर्जा वाढते व स्वीकार भाव, साक्षी भाव, दृष्टा भाव , नष्टोमोहा प्रवृत्ती तयार होते .प्रत्येक दिवस आनंदाने जगायचा असेल, उत्सव पूर्ण जगायचा असेल तर योगाच्या माध्यमातून दररोज परमेश्वराचे ध्यान व योग केले पाहिजे .असे बहुमोल विचार श्री इंगळे सर, बीके पुष्पा दीदी, सविता दीदी, छाया दीदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने काढले. या प्रसंगी ओम शांती सेंटर या ठिकाणी सकाळी सात वाजेला जे नियमित सेंटरला येतात असे आबा भाई अनिल भाई राठी भाई शांताराम भाई साहेबराव भाई व माता उपस्थित होत्या. यापुढे ज्यांना ज्यांना योग साधनेसाठी ध्यानासाठी या वयाचे असेल त्यांनी दररोज सकाळी सात वाजेला येण्यास हरकत नाही असे बीके पुष्पा दीदी यांनी सांगितले .ओम शांती.
