- ब्रह्माकुमारीज् राजयोगाने आत्मिक शांती मिळते
आमदार अमोल पाटील यांचे प्रतिपादन……- अमरनाथ गुफा प्रतिकृतीचे हजारो भविकांनी घेतले दर्शन
ब्रह्माकुमारीज् आयोजित अमरनाथ महोत्सवाची सांगता…
एरंडोल प्रतिनिधी- एरंडोल येथे ब्रह्माकुमारीज् संस्थेने हजारो नागरीकांच्या जीवनात आणलेले परिवर्तन राजयोगामुळे शक्य झाले असून त्यामुळे आत्मिक शांती मिळणे असे प्रतिपादन आमदार अमोल पाटील यांनी केले. अमरनाथ महोत्सवातील सांगात समारोहात ते बोलत होते. ब्रह्माकुमारीज् च्या अमरनाथ महोत्सवाची सांगता आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते महाआरती करुन झाली. महोत्सवात हजारो भाविकांनी दर्शन घेतले.![]()
- प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या एरंडोल सेवाकेंद्रातर्फे तीन दिवसीय बर्फानी अमरनाथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. अमरनाथ यांचे प्रतिकात्मक शिवलिंग आणि बारा ज्योर्तिलिंग दर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती
अमरनाथ गुफा शिवदर्शन उद्घाटन माजी आमदार चिमणराव पाटील व ब्रह्माकुमारी मीनाक्षी दीदी उपक्षेत्र निर्देशिका ब्रह्माकुमारीज् जळगाव, ब्र.कु. पुष्पादीदी, ब्र.कु. सवितादीदी यांच्या शुभहस्ते झाले. सूत्र संचलन डॉ. रेखा साळुंखे यांनी केले.*▪️मान्यवरांनी घेतले दर्शन :*तीन दिवसीय महोत्सवात शिवदर्शन गुफा मंदिर दर्शनाचा हजारो नागरीकांसह मान्यवरांनीही लाभ घेतला. त्यात आमदार श्री अमोल चिमणराव पाटील ,माजी आमदार महेंद्रसिंग बापू पाटील, य.च. शि. प्र. संस्थेचे अध्यक्ष अमितदादा पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल पाटील ,शिवसेना उबाठा तालुका अध्यक्ष जगदीश पाटील ,माजी जिल्हा परिषद सभासद नाना महाजन ,नगरसेवक एन डी पाटील ,जिल्हा युवा अध्यक्ष शिंदे गट मनोज पाटील आर पी आय अध्यक्ष शालिकग्राम गायकवाड, माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन मान्यवरांनी उपस्थिती दिली. डॉ. सुधीर काबरा अध्यक्ष. एरंडोल तालुका डॉक्टर असोसिएशन यांचे ही मोलाचे योगदान मिळाले तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी गोविन्द वर्मा ,गणेश महाजन ,मेडिकल असोसएशनच्या वतीने डॉ.किरण पाटील, आई हॉस्पिटल, स्वामी मेडिकल सतीश पाटील, महेश पाटील, आणि शरद चौधरी, इंगळे सर, पुंडलिक पवार,मनोज ठाकूर , कृष्णा धनगर ,पांडुरंग महाजन ,गजानन महाजन, निंबा महाजन,पाचोरा तथा एरंडोल नगरीतील ब्रह्माकुमारीज् परीवारातील सर्व राजयोगी बंधू भगीनीं यांनी मोलाचे योगदान दिले.
ब्र
![]()
ह्माकुमारी संस्था ऊर्जेचे स्थान आहे याठिकाणी येऊन सकारात्मकता मिळते शांतीचा अनुभव होतो हे माझे सौभाग्य आहे त्या निमित्ताने आम्हाला नवीन ऊर्जा मिळते. असे प्रतिपादन माजी आमदार चिमणराव पाटील यांनी केले.सर्वांनी सेवाकेंद्रात येऊन स्वत:साठी राजयोग ध्यानाभ्यास करावे असेही आवाहन केले. या कार्यक्रमास सविता दिदी व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रतिकृती तयार करण्यास रात्रंदिवस परिश्रम घेतले