Home » राजकीय » *भाजप-शिंदे शिवसेना युतीचे डॉ.नरेंद्र ठाकूर ​यांचा भव्य रॅलीद्वारे नगराध्यक्ष पदासाठी नामांकन अर्ज दाखल,आमदार अमोल पाटील यांच्यासह दिग्गज नेत्यांची उपस्थिती…..!*

*भाजप-शिंदे शिवसेना युतीचे डॉ.नरेंद्र ठाकूर ​यांचा भव्य रॅलीद्वारे नगराध्यक्ष पदासाठी नामांकन अर्ज दाखल,आमदार अमोल पाटील यांच्यासह दिग्गज नेत्यांची उपस्थिती…..!*

  1. *भाजप-शिंदे शिवसेना युतीचे डॉ.नरेंद्र ठाकूर ​यांचा भव्य रॅलीद्वारे नगराध्यक्ष पदासाठी नामांकन अर्ज दाखल,आमदार अमोल पाटील यांच्यासह दिग्गज नेत्यांची उपस्थिती…..!*

    ​एरंडोल – एरंडोल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी भाजपा व शिंदे शिवसेना युतीचे अधिकृत उमेदवार डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी रविवारी १६ नोव्हेंबर २०२५ रोजी नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज मोठ्या जनसमुदायाच्या साक्षीने दाखल केला.एरंडोलचे आमदार अमोल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या भव्य शक्तीप्रदर्शनामुळे एरंडोलच्या राजकीय वातावरणात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
    ​नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यापूर्वी सकाळी डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी शहरातील दक्षिण मुखी हनुमान मंदिर येथून एका भव्य मिरवणुकीला सुरुवात केली. भाजप आणि शिंदे शिवसेनेचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षाचे झेंडे घेऊन मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते.​ही मिरवणूक म्हसावद नाका, मरी आई मंदिर आणि मेन रोड मार्गे निघाली.रॅली दरम्यान मरी आई मंदिर येथे आमदार अमोल पाटील आणि डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी देवीचे दर्शन घेऊन मिरवणुकीला प्रारंभ केला.तसेच मेन रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून डॉ. ठाकूर यांनी अभिवादन केले.महायुतीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दाखवलेली ही अभूतपूर्व एकजूट एरंडोलच्या निवडणुकीसाठी एक महत्त्वपूर्ण आणि निर्णायक संदेश देणारी ठरली.
    ​यावेळी डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपला नामांकन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रदीप पाटील आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी अमोल बागुल यांच्याकडे दाखल केला.यावेळी त्यांच्या अर्धांगिनी डॉ. गितांजली ठाकूर यांनी देखील नगरसेविका पदासाठी नामांकन अर्ज दाखल केला आहे.
    ​या नामांकन सोहळ्याला महायुतीचे अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. त्यात एरंडोल विधानसभेचे आमदार अमोल चिमणराव पाटील यांची विशेष उपस्थिती होती.​याव्यतिरिक्त भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, सामाजिक कार्यकर्ते भगवान महाजन, माजी जि.प. सदस्य नानाभाऊ महाजन, भाजप शहर अध्यक्ष योगेश महाजन, युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. मनोज पाटील, एस.आर. पाटील, सुनील पाटील, माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी, शिवसेना शिंदे गट तालुका प्रमुख रविंद्र जाधव, तालुका निवडणूक प्रभारी राजेंद्र सोनवणे, कुणाल महाजन, ज्येष्ठ नेते जगदीश पाटील, प्रमोद महाजन, सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे, गितांजली ठाकूर, छाया दाभाडे,यांच्यासह महायुतीचे असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
संबंधित बातम्या