- भारतीय जनता पार्टी एरंडोल मंडळातर्फे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा तीव्र निषेध व आंदोलन……..
प्रतिनिधी एरंडोल – येथे दि. 15/02/2026 रोजी सायंकाळी 5.00 वाजेला धरणगांव चौफुली जवळ भारतीय जनता पार्टी एरंडोल मंडळातर्फे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा तीव्र निषेध व आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ पोपट महाजन, प्रदेश सदस्य सुनील भैया पाटील, जिल्हा उपाध्यक्ष एस. आर. पाटील, मंडळाध्यक्ष योगेश युवराज महाजन, यावेळी मान्यवरांनी संताप वेक्त करून नानाभाऊ महाजन यांनी भाषणात नमूद केले की छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करून त्यांना समकक्ष ठरवण्याचा जो दुर्दैवी व आक्षेपार्ह प्रकार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केला ते केवळ ऐतिहासिक अज्ञानच नव्हे तर महाराष्ट्राच्या अस्मितेवर थेट घाला आहे.छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना जबरदस्तीने धर्मांध राजवटीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या टीपू सुलतानशी करणं म्हणजे इतिहासाचा अपमान आहे.
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या या विधानाबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशा व्यक्तीला महाराष्ट्रात राहण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांच्या विधानाबद्दल केवळ माफी नव्हे, तर काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून बडतर्फ करावं अशी मागणी भारतीय जनता पार्टी एरंडोल मंडळाकडून करण्यात आली.
याप्रसंगी हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडेमार करून, जाळून व घोषणा देऊन निषेध करण्यात आला.
- सरचिटणीस अमरजितसिंग पाटील तसेच ऍड. मधूकर देशमुख, सचिन विसपुते, पिंटू राजपूत, राहुल बडगुजर, आनंदा चौधरी ( भगत ), प्रमोद महाजन, बाजीराव पांढरे, मयूर ठाकूर, पिंटू राजपूत ( पिंपळकोठा ), रवींद्र चौधरी, मोतीलाल पाटील व सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
