- *भालगांव येथे आषाढी एकादशी यात्रोत्सव निमित्त हजारो भाविकांनी घेतले विठ्ठल रूक्मिणीचे दर्शन……..!*
*भाविकांना साडेतीन टन साबुदाणा खिचडीचे वाटप……!*
एरंडोल प्रतिनिधी – तालुक्यातील प्रतिपंढरपुर म्हणून नावारूपाला आलेले भालगांव येथे विठ्ठल मंदिरात भल्या पहाटे ४ वाजता आरती व महापुजा झाल्यानंतर देवालय भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.सामाजिक कार्यकर्ते मनोज मराठे यांच्यातर्फे भक्तांना खिचडी वाटप सुरू करण्यात आली.दिवसभर जवळपास साडेतीन टन साबुदाणा खिचडीचा हजारो भाविकांना लाभ देण्यात आला.बाहेरगावाहून १० पालख्या दाखल झाल्या.जवळपास १२ ते १५ हजार भाविकांनी हजेरी लावली.
या निमित्त विठ्ठल रूक्मिणी मंदिर परिसरात यात्रोत्सव भरला होता.तसेच गावातून टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल रूक्मिणी प्रतिमांची मिरवणूक काढण्यात आली.विठ्ठल मंदिर संस्थानचे अध्यक्ष देविदास मराठे, सरपंच नामदेव पाटील, श्रीराम मराठे, ईश्वर मराठे, माजी सरपंच कैलास पाटील, सुभाष पाटील,छोटू मराठे, गोविंदा मराठे यांनी यात्रोत्सवाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.