Home » सामाजिक » मंठा येथील श्री जगदंबा माता मोफत दर्शन यात्रेचा आज पासून शुभारंभ.

मंठा येथील श्री जगदंबा माता मोफत दर्शन यात्रेचा आज पासून शुभारंभ.

  • मंठा येथील श्री जगदंबा माता मोफत दर्शन यात्रेचा आज पासून शुभारंभ.
  • शिवाजी शिंदे प्रतिनिधी परभणी —नवरात्री निमित्त
  • विनोद बोराडे व मित्र मंडळाचा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून मोफत वाहन सुविधा सुरु. उपक्रम सुरु.
  • सेलू :नवरात्रमहोत्सवा निमित्त गेल्या अनेक वर्षा पासून सेलू शहरातील सर्व महिला भगिनींना मंठा येथील श्री जगदंबा मातेचे दर्शन घडावे,या उद्धेशाने माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे व मित्र मंडळाच्या वतीने आज पासून (दि.07 ऑक्टो.) श्री जगदंबा माता दर्शन यात्रा सुरु करण्यात आली आहे. याचा अधिकाधिक महिला भक्तानी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे. पाचव्या माळेपासून ते आठव्या माळेपर्यंत ( 07 ऑक्टोंबर ते 10 ऑक्टोबर 2024) प्रर्यन्त महिला भाविकांची जाण्या- येण्यासाठी मोफत वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. श्री.साईबाबा मंदिर परिसरात ही वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. श्री साईबाबा मंदिर महेश नगर ते मंठा व परत श्री साईबाबा मंदिर, असा दर्शन प्रवास राहील.सकाळी 9 ते सायंकाळी 4 असा दर्शन यात्रेसाठी वेळ दिला आहे. फक्त महिलांसाठीच ही व्यवस्था करण्यात आली आहे. मोफत दर्शन यात्रा प्रवासा साठी संपर्क क्रमांक 9960419390,9371718525,8421249212 या नंबर वर संपर्क करावा असे संयोजकानी कळविले आहे. दरवर्षी हा उपक्रम माजी नगराध्यक्ष गेल्या अनेक वर्षांपासून चांगल्या प्रकारे राबवीत असतात.या उपक्रमाला महिला भाविकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आला आहे. मित्र मंडळ आणी त्यांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते हिरहिरीने पुढाकार घेऊन उपक्रम अतिशय नियोजनबद्ध राबवीत असतात.यंदाही आज पहिल्याच दिवशी सकाळी विनोद बोराडे मित्र मंडळ यांनी ह.भ.प. नंदकिशोरजी पुराणिक (श्री गोंदिकर महाराज ) यांच्या शुभ हस्ते श्री जगदंबा माता दर्शन यात्रा, मंठा यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. तत्पूर्वी ह.भ.प. नंदकिशोरजी पुराणिक यांचे स्वागत शाल,पुष्पहार घालून विनोद बोराडे यांनी केले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, साईराज बोराडे,प्रतिक बोराडे, राजेंद्र पवार,लक्ष्मण बुरेवार, व्यंकटीबापू चव्हाण, जनाअब्बा सोळंके,मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी आदी उपस्थित होते. आज पहिल्या दिवशी या उपक्रमाला हजारो महिला भक्तांनी प्रतिसाद देत दर्शनाचा लाभ घेतला.सर्व महिला भक्तांनी विनोद बोराडे व मित्र मंडळाचे आभार व्यक्त करत हा उपक्रम अतिशय सुंदर रित्या राबवीत असल्या बद्धल धन्यवाद व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
संबंधित बातम्या