Home » महाराष्ट्र » मुलगी होती म्हणून काकाने घेतले भावेशला दत्तक पण त्याने १२वी ला कमी गुण मिळाले म्हणून बहिणीच्या घरी केली आत्महत्या..!

मुलगी होती म्हणून काकाने घेतले भावेशला दत्तक पण त्याने १२वी ला कमी गुण मिळाले म्हणून बहिणीच्या घरी केली आत्महत्या..!

  1. मुलगी होती म्हणून काकाने घेतले भावेशला दत्तक पण त्याने १२वी ला कमी गुण मिळाले म्हणून बहिणीच्या घरी केली आत्महत्या..!

  2. एरंडोल प्रतिनिधी : येथील पाताळ नगरी मधील रहिवासी प्रकाश रतन महाजन यांची बुधवार दरवाजा परिसरात पान टपरी होती. त्यांनी भावेश महाजन वय १९ वर्षे नामक या त्यांच्या सख्खा पुतण्यास दत्तक घेतले होते. कारण त्यांना एकच मुलगी होती. भावेश हा उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये बहिणीच्या घरी पाचोरा येथे गेला होता. त्याची बहीण व मेहुणे हे पुणे येथे गेले असता सोमवारी त्याच्या १२वी बोर्ड परीक्षेचा निकाल लागला त्यात त्यास ४२टक्के गुण प्राप्त झाल्याने. या गुण कमी मिळाल्याच्या नैराश्यापोटी त्याने पाचोरा येथे बहिणीच्या घरीच आपली जीवनयात्रा संपवली.
    विशेष हे की,
    अवघ्या ६महिन्यांपूर्वीच भावेश चे वडील प्रकाश महाजन यांचे हृदविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले होते.
    भावेश प्रकाश महाजन हा एरंडोल येथे डी डी एस पी महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिकत होता.
    केवळ टक्केवारी कमी मिळाल्याचे जिव्हारी लागल्याने भावेश ने अल्पवयातच मृत्यू ला अलिंगन दिले याबद्दल पाचोरा व एरंडोल येथे हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या

एरंडोल येथे १५ वा सत्यशोधक विवाह संपन्न !.. तात्यासाहेब व माईंच्या जीवनावर आधारित फुले चित्रपट सर्वांनी सहकुटुंब पहावा – पी डी पाटील ( जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज संघ ) बहुजनांनी भटमुक्त होऊन सत्यशोधकाची कास धरावी – हेमंत माळी ( जिल्हा कोषाध्यक्ष – सत्यशोधक समाज संघ ) वधू-वरांना महापुरुषांचे ग्रंथ भेट

*माळपिंप्री येथील मारहाण प्रकरणी दुसऱ्या गटातील आरोपींवर ॲट्राॅसिटीनुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत या मागणीसाठी पोलीस महानिरीक्षक नाशिक यांच्या कार्यालयासमोर डफ बजाओ आंदोलन…..!*