Home » सामाजिक » यावलला ‘खान्देशी धमाका’ उत्साहात संपन्न कलाकारांच्या प्रदर्शनाने प्रेक्षक मंत्रमुग्ध* डॉ कुंदन फेगडेंनी स्थानिक युवकांना कलाक्षेत्राकडे वळण्याची केले अवाहन

यावलला ‘खान्देशी धमाका’ उत्साहात संपन्न कलाकारांच्या प्रदर्शनाने प्रेक्षक मंत्रमुग्ध* डॉ कुंदन फेगडेंनी स्थानिक युवकांना कलाक्षेत्राकडे वळण्याची केले अवाहन

*यावलला ‘खान्देशी धमाका’ उत्साहात संपन्न कलाकारांच्या प्रदर्शनाने प्रेक्षक मंत्रमुग्ध*

डॉ कुंदन फेगडेंनी स्थानिक युवकांना कलाक्षेत्राकडे वळण्याची केले अवाहन

रावेर प्रतिनिधी: – आश्रय फाउंडेशन यावलच्या वतीने आणि अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे यांच्या संकल्पनेतून खानदेशी अहीराणी सुपरस्टार्सचा ‘खान्देशी धमाका’ हा कार्यक्रम नुकताच यावल येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाला. यावेळी खानदेशी सुपरस्टार्सला बघण्यासाठी मोठी गर्दी जमली होती.

कार्यक्रमाला खानदेशी सुपरस्टार सचिन कुमावत, आबासाहेब चौधरी, पुष्पाताई ठाकूर, भैया मोरे, मेघा मुसळे, प्रशांत देसले, धिरज चौधरी, अशोक वानरसे, दीपक देवराज, कावेरीताई पाटील, विनोद कुमावत आणि विलास वाघ यांनी आपली कला सादर केली. नागरिक, युवक, आणि महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उद्योगपती कै. रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सर्व खानदेशी लोककलावंतांचा सत्कार डॉ. कुंदन फेगडे यांनी केला. आयोजनास सहकार्य करणाऱ्या सर्व स्वयंसेवकांचे त्यांनी जाहीर आभार मानले. यावेळी श्री डॉ फेगडे मनोगत व्यक्त करतांना म्हणाले.आताच्या युवकांनी लोकल कलांकडे जास्तीत जास्त संख्येने वळायला हवे.यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी, यावल परिसरातील नागरिक, युवक, आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
संबंधित बातम्या