-
*राजधर महाजन यांचा राज्यस्तरीय माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून पुणे येथे सन्मान……..!*
एरंडोल प्रतिनिधी – पुणे येथील ज्ञानमाता माहिती अधिकार नागरिक समुह यांचे तिसरे महाअधिवेशन लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे कलादालन,येरवडा, पुणे येथे १२ ऑक्टोबर २०२५ रोजी उत्साहात पार पडला.यावेळी पुणे महानगरपालिकेचे मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांच्या हस्ते एरंडोल येथील माहिती अधिकार कार्यकर्ते राजधर महाजन यांचा राज्यस्तरीय माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून सन्मान करण्यात आला.माहिती अधिकार कार्याबाबत जनजागृती निर्माण करणे आणि नागरिकांच्या हक्कांसाठी सातत्याने काम केल्याबद्दल राजधर महाजन यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
हा सन्मान माझ्या कार्याला अधिक बळ देणारा आहे.पुढच्या काळातही समाज हितासाठी नि:स्वार्थपणे मी काम करीत राहीन.अशी ग्वाही राजधर महाजन यांनी याप्रसंगी दिली.