Home » राजकीय » राज्य व केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळात पोहोचवण्यासाठी समन्वय आवश्यक – आमदार अमोलदादा पाटील यांनी केले आव्हान

राज्य व केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळात पोहोचवण्यासाठी समन्वय आवश्यक – आमदार अमोलदादा पाटील यांनी केले आव्हान

  1. राज्य व केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळात पोहोचवण्यासाठी समन्वय आवश्यक – आमदार अमोलदादा पाटील यांनी केले आव्हान

    एरंडोल प्रतिनिधी  :- शेतकरी सहकारी संघ, एरंडोल यांच्या वतीने खरीप हंगाम २०२५–२६ साठी ज्वारी व मका खरेदी केंद्राचा शुभारंभ आज आमदार मा. अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

    याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, तहसिलदार गोपाल पाटील, पारोळा शिवसेना तालुकाप्रमुख मधुकरआबा पाटील, एरंडोल शिवसेना तालुकाप्रमुख तथा शेतकी संघ संचालक रविभाऊ जाधव, शेतकी संघाचे अध्यक्ष गजानन धनसिंग पाटील, संचालक शरद पाटील, तिरलोकसिंग पाटील, रविंद्र चौधरी यांचेसह आदी मान्यवर उपस्थित होते.

    यावेळी आमदार मा. अमोलदादा पाटील बोलत होते की, “राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासन, सहकारी संस्था आणि लोकप्रतिनिधी यांनी परस्पर समन्वयाने काम करणे अत्यंत गरजेचे आहे.”

    एरंडोल तालुका शेतकरी सहकारी संघामार्फत ज्वारी पिकासाठी २०० तर मका पिकासाठी ४१० शेतकऱ्यांनी नोंदणी पूर्ण केली आहे. शासनाने ज्वारीसाठी ₹३,६९९ तर मका पिकासाठी ₹२,४०० असा हमीभाव निश्चित केला असून ज्वारीसाठी १,४०० क्विंटल व मक्यासाठी १,६०० क्विंटल इतके उद्दिष्ट देण्यात आले आहे.

    “आपला शेतकरी राजा प्रचंड मेहनत करतो, घाम गाळतो; मात्र योग्य दर, वेळेत खरेदी आणि पारदर्शक व्यवहारासाठी त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर हे खरेदी केंद्र सुरू होणे म्हणजे शेतकऱ्यांच्या हक्काला न्याय देण्याच्या दिशेने उचललेले ठोस पाऊल आहे,” असे आमदार पाटील यांनी सांगितले.

    शेतकरी सहकारी संघाने नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले असून, हमीभाव, दलालमुक्त व्यवहार आणि थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यासाठी हे खरेदी केंद्र अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

    यावेळी आमदार पाटील यांनी स्पष्ट केले की, “शासनाने निश्चित केलेले उद्दिष्ट जरी मर्यादित असले तरी नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांची खरेदी पूर्ण व्हावी, यासाठी शासन दरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला जाईल. वेळेत खरेदी, वजनात पारदर्शकता आणि तात्काळ देयके याची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे.”

    “एरंडोल विधानसभा मतदारसंघातील शेतकरी सक्षम झाला, तरच परिसराचा सर्वांगीण विकास होईल. शेती, सिंचन, वीज, रस्ते आणि बाजारपेठ या सर्व बाबींमध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका आम्ही सातत्याने घेतली आहे आणि पुढेही घेत राहू,” असेही आमदार पाटील यांनी सांगितले.

    कार्यक्रमाच्या शेवटी खरेदी केंद्राच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शेतकरी सहकारी संघाचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी आणि प्रशासनाचे आमदार मा. अमोलदादा पाटील यांनी अभिनंदन केले

  2.  तसेच संघांचे कर्मचारी अरुण पाटील, जगदीश पाटील, भगवान महाजन, सोपान बडगूजर इतर तसेच पुरवठा अधिकारी विवेक वैराळकर, श्रीमती वैशाली पाचपोर, ऋषीप्रसाद पोळ हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
संबंधित बातम्या