Home » राजकीय » राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश संघटक अनिल महाजन यांनी सुध्दा आमदारकीसाठी एरंडोल मतदार संघात घेतली उडी…..!

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश संघटक अनिल महाजन यांनी सुध्दा आमदारकीसाठी एरंडोल मतदार संघात घेतली उडी…..!


एरंडोल प्रतिनिधी – शासकीय विश्रामगृहावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश संघटक अनिल महाजन यांनी येथे शुक्रवारी २७ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघात ‘ मी पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीसाठी प्रबळ दावेदारी केली असल्याचे ‘ घोषित केले आहे.
यावेळी अनिल महाजन यांनी एरंडोल पारोळा तालुक्याचा औद्योगिक विकास करण्याचा आपला मानस असून या माध्यमातून अनेक युवक, युवती व महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा माझा अजेंडा असल्याचे अनिल महाजन यांनी सांगितले.यावेळी मतदार संघात परिवर्तनाचे वारे वाहत असून जनता विकास करणाऱ्या उमेदवाराला संधी देऊन परिवर्तन घडवून आणेल.असा दावा करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या