-
*रिंगणगांव येथे धाडसी चोरी,२ लाख ८७ हजाराचा ऐवज लंपास………!*
एरंडोल प्रतिनिधी – तालुक्यातील रिंगणगांव येथे दत्तात्रय पंढरीनाथ माळी हे कुलुप लावून बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी संधी साधून रोकड रकमेसह सोन्याचांदीचे दागिने मिळून २ लाख ८७ हजार रुपयांचा ऐवज लंपास करून पोबारा केला.ही घटना १३ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर २०२५ दरम्यान घडली.
रिंगणगांव येथील दत्तात्रय पंढरीनाथ माळी हे धरणगाव येथे त्यांचा मुलगा विनायक यांचेकडे महादेव मंदिराची स्थापना असल्याने माळी हे घराला कुलूप लावून गेले असता अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि गोदरेज कपाट उघडून त्यातील १ लाख ६० हजार रुपये रोकड व १ लाख २७ हजार रुपये किंमतीचे सोन्याचांदीच्या दागिन्यांवर हात मारला.याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला १५ ऑक्टोबर २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.सहाय्यक फौजदार राजेश पाटील व अमोल भोसले हे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत.