-
*वसंत हंकारे यांच्या आई बाप समजून घेतांना काळजाला भिडणाऱ्या या कार्यक्रमास एरंडोलकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद…..!*
एरंडोल – येथे आमदार अमोल चिमणराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रा.ति.काबरे विद्यालयाच्या प्रांगणात शिवसेना व युवासेना एरंडोल शहर व तालुका शाखेतर्फे युवा समाज परिवर्तनकार वसंत हंकारे यांचे ‘ आई – बाप समजून घेतांना ‘ या विषयावर प्रबोधनपर व्याख्यान ४ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री आयोजन करण्यात आले.यावेळी शालेय विद्यार्थी व विद्यार्थीनी, युवक व युवती, महिला, पालक व नागरिक यांची लक्षणीय गर्दी झाली.वसंत हंकारे यांच्या सव्वा तासाच्या आवेशपूर्ण प्रबोधनाने युवक युवती व आईवडीलांचे डोळे पाणावले होते.
व्यासपीठावर आमदार अमोल पाटील, पारोळा नगरीच्या माजी नगराध्यक्षा नलीनीताई पाटील, कार्यक्रमाचे आयोजक प्रा.मनोज पाटील व आनंद दाभाडे,जि.प.चे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले,शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष वासुदेव पाटील,रेखा चौधरी,सुरेखा चौधरी,मृणालिनीताई पाटील,सरलाबाई पाटील,छाया दाभाडे,कुणाल महाजन,रवि जाधव,सुदाम राक्षे, प्रभाकर पाटील,गबाजी पाटील,बबलू पाटील व आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी राजे, जिजाऊ, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर या थोर महापुरुषांचा जयजयकार करून वसंत हंकारे यांनी व्याख्यानाची सुरूवात केली.शाळेच्य चारही भिंती आम्हाला चारित्र्यवान माणसे देतात,जे घर आनंदी तिथे मुले आनंदी,आमच्यातली माणुसकी हरत चालली आहे, घरात आई आणि बाप ते घर श्रीमंत, ज्या आई ने ९ महिने ९ दिवस तिच्या उधरामध्ये ठेवते.ती आई तुम्हाला कळाली का? आई बापाच्या तोंडावर थुकतात, पहिला मुका घेणारी पहिली आई असते, सावित्री आई शिकवत होती म्हणुन लाखो सावित्री तयार झाल्या, राष्ट्राची शान अभिमान तू आहेस मुलगी, तुम्हाला तुमचा बाप कळलां का? जेव्हा मुलांचा जन्म झाला त्या वेळेस तिने…., सासरहून घरी गेल्यावर सर्वात आधी अंगणात बापाची चप्पल दिसत होती,एकदाचा बापाचा हात डोक्यावरून उठला सगळ परकं होतं, जो पर्यंत आई बापाचा श्वास जिवंत आहे तो पर्यंत श्वासावर प्रेंम करतं जा भिंतीवरील आई बाप पुन्हा खाली येणारं नाही, आई बापाला लाचार करू लागले, त्यांना पोलिस स्टेशनलां उभं करतात, जगातला देव देव केला पण घरातला आई बाप कळाला नाहीं, तिन वेळचे अन्न रोज यावे त्या साठी बाप ७ वांजेला घर सोडतो, हरवलेला बाप परत मिळाला आज, रणरागिणी वाघिणी आहेत, लढायच आयुष्य तुमचे आहे ,व्यसन करायचं तर संभाजी सारखे करायचे, रडायचं नाही तर लढायचं, खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसणार नाही.असे प्रतिपादन वसंत हंकारे यांनी केले.
प्रास्ताविक युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा आयोजक प्रा.मनोज पाटील यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राकेश पाटील यांनी केले.आभारप्रदर्शन प्रा.मनोज पाटील यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आनंद दाभाडे व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.