Home » राजकीय » *वादळी पावसामुळे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना ४ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान प्रमाणपत्राचे वाटप…….!*

*वादळी पावसामुळे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना ४ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान प्रमाणपत्राचे वाटप…….!*

  1. *वादळी पावसामुळे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना ४ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान प्रमाणपत्राचे वाटप…….!*
  2.  


    एरंडोल प्रतिनिधी – तालुक्यात ११ जून २०२५ रोजी झालेल्या वादळी पावसामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रिंगणगांव येथील जगन्नाथ श्रावण रोहिमारे व फरकांडे येथील नारायण सिताराम पाटील यांच्या वारसांना एरंडोल तहसील कार्यालय येथे प्रत्येकी ४ लाख रुपये सानुग्रह अनुदान प्रमाणपत्राचे वाटप आमदार अमोल चिमणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
    याप्रसंगी तहसीलदार प्रदीप पाटील, निवासी नायब तहसीलदार संजय घुले,नायब तहसीलदार दिलीप पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष वासुदेव पाटील हे उपस्थित होते.
    जगन्नाथ रोहिमारे यांचा घराची भिंत अंगावर पडल्याने मृत्यू झाला होता.त्यांची वारस पत्नी पुजाबाई रोहिमारे यांना तसेच नारायण पाटील यांच्या अंगावर घराची पत्रे पडून मृत्यू झाला होता.त्यांचे वारस गजानन पाटील यांना सानुग्रह अनुदान वाटप केल्या बाबत प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या

आमदार अमोलदादा पाटील यांच्या प्रयत्नांना यश साठवण तलाव पद्मालय -2 उपसा सिंचन योजना ता.एरंडोल प्रकल्पाचा रुपये 1072.45 कोटी किंमतीच्या द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावास मंजुरी