-
*विखरण येथे महसूल सप्ताहानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन…..!*
*अंमलबजावणीचे सुक्ष्म नियोजन असल्यास, वंचित लाभार्थ्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत – आमदार अमोल पाटील….!
एरंडोल प्रतिनिधी – तालुक्यातील विखरण येथे ४ ऑगस्ट २०२५ रोजी महसुल व वनविभाग अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान आमदार अमोल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.यावेळी महसुल, कृषि, आरोग्य, वनविभाग यांसह विविध विभागांचे वैयक्तिक लाभासह इतर लाभ आमदार अमोल चिमणराव पाटील यांच्या शुभहस्ते लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले.याप्रसंगी शेती विषयक माहीती पुस्तिकेचे विमोचन देखील आमदार अमोल पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
” छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर ‘ माझी जमीन माझा हक्क ‘ हे पुढचं सशक्त पाऊल आहे.यामध्ये लवकर निकाल,निश्चित वेळेत सेवा आणि त्रुटींचे जलद निरसन यावर भर दिला जातो. हा उपक्रम म्हणजे शेतकऱ्यांपासून शहरातील नागरिकांपर्यंत सर्वांसाठी सोपे व पारदर्शक जमिनीचे हक्क, वैयक्तिक लाभ, इतर शासकीय योजना यांसह अन्य लाभ यात समाविष्ट आहेत. योजनांचा मुख्य हेतु हा समाजातील शेवटच्या घटकाला लाभ घेता यावा, यासाठीच असतो. त्यामुळे अंमलबजावणीचे सुक्ष्म नियोजन असल्यास, वंचित लाभार्थ्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. महायुती सरकारने महसुल,वन, ग्रामविकास, आरोग्य यांसह विविध विभागांचे थेट लाभ हे लाभार्थ्यांना व्हावे यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान, महसुल सप्ताह यांसह अन्य उपक्रम सुरू केले आहेत. हे उपक्रम शेतकरी-कष्टकरी, गोर-गरीब सर्वसामान्य जनतेसाठी लाभदायक असल्याचे मत आमदार अमोल पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी मनिषकुमार गायकवाड, तहसिलदार प्रदिप पाटील, गटविकास अधिकारी दादाजी जाधव,मंडळ अधिकारी एरंडोल सुनिता चौधरी, ग्राम महसूल अधिकारी मनोज सोनवणे, सागर कोळी,अमर भिंगारे,आकाश बनकर आणि महसूल सेवक सुदाम पाटील,पंकज भोई,शिवसेना तालुका संघटक संभाजी पाटील,एरंडोल नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष अतुल महाजन,विखरण सरपंच गोपाल महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच विविध गावांच्या ग्रामपंचायत,विकासो व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य,विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते.