Home » राजकीय » विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती… कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम अवस्था…

विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती… कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम अवस्था…

    • एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत जवळपास सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपआपले नामांकन अर्ज दाखल केले आहे तसेच एकाच पक्षातील दोन दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे महाविकास आघाडी व महायुतीमध्ये पक्षाच्या वतीने एक एक उमेदवाराला एबी फॉर्म देण्यात आले असले तरी महाविकास आघाडी व युतीमध्ये बंडखोर उमेदवारांनी देखील आपापले नामांकन अर्ज दाखल केले आहे.
      शिवसेना बीजेपी यांच्यात पडलेली फुट तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील झालेली फुट यामुळे मतदार संघावर सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी दावा केल्यामुळे काही नाराज नेत्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याचे दिसून येत आहे त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ते हे देखील मोठ्या विवंचनेत दिसून येत आहे पक्षाचे नेतृत्व स्वीकारावे की आपल्या जवळच्या नेत्याचे काम करावे असे प्रश्न भेडसावत आहे
      एकाच पक्षातील दोन दोन उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केलेले असल्यामुळे कुठल्या नेत्याचा प्रचाराला आपण सहभाग घ्यावा हा मोठा प्रश्न त्यांच्यात निर्माण झालेला आहे कुठल्या पक्षाचा झेंडा घेऊन आपण प्रचार करावा कोणासोबत जावे कसे जावे का जावे असे प्रश्न त्यांच्या मनात उपस्थित होत आहे तरी नेत्यांनीच आता स्वतःला स्वतःची समजूत घालून योग्य निर्णय घ्यावा व कार्यकर्त्यांना या विवंचनेतून सुटका करावी अशी आर्त हात कार्यकर्त्यांच्या मनातून केली जात आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या