(नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी): शहादा येथील विश्रामगृहात शहादा तालुका पत्रकार संघाची बैठक ज्येष्ठ पत्रकार प्रा.डी.सी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. यावेळी सर्वानुमते नूतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. शहादा तालुका पत्रकार संघाच्या कार्यकारिणीच्या वार्षिक बैठकीत येत्या वर्षातील विविध कार्यक्रम घेण्याबाबत चर्चा करून सर्वानुमते नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्ष – प्रा.नेत्रदीपक कुवर, सचिव – योगेश सावंत, कार्याध्यक्ष – प्रा.डी.सी. पाटील, उपाध्यक्ष – हर्षल साळुंखे, कोषाध्यक्ष – ए.ए. खान, कार्यकारणी सदस्य – सुनिल सोमवंशी, चंद्रकांत शिवदे, दीपक वाघ, दिनेश निकम, सल्लागार – प्रा.दत्ता वाघ, प्रा.रवींद्र पंड्या, राजेंद्र अग्रवाल, कायदेशीर सल्लागार – ॲड.राजेश कुलकर्णी अशी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. बैठकीत राजेंद्र अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले. नूतन अध्यक्ष प्रा.एन.के.कुवर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा.डी.सी.पाटील यांनी अध्यक्षीय समारोप करतांना म्हटले की, पत्रकार संघाच्या वतीने सामाजिक उपक्रमात सहभागी झाले पाहिजे. तसेच सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील रहावे.
सूत्रसंचालन योगेश सावंत यांनी केले.आभार हर्षल साळुंके यांनी मानले.