Home » महाराष्ट्र » शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीतर्फे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन…….

शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीतर्फे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन…….

 

  • एरंडोल प्रतिनिधी — पळासदळ, एरंडोल येथील शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मस मध्ये फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आयोजित केले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जळगाव च्या श्रम साधना ट्रस्ट मुंबई संचालित इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. अमोल लांडगे व सोबत गव्हर्मेंट फार्मसी जळगाव च्या विभाग प्रमुख डॉ. चैताली पवार लांडगे यांना आमंत्रित होते .कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व प्राचार्य डॉ. विजय शास्त्री यांनी प्राध्यापकांना मार्गदर्शनासाठी घेण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाचा उद्देश्य मांडला, तसेच स्वतः च्या सत्तावीस वर्षाच्या अनुभवातून उपस्थित प्राध्यापकांचे मार्गदर्शन केले.  प्राचार्य डॉ. अमोल लांडगे यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयात गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करण्यासाठी प्राध्यापकांच्या कौशल्यांची वाढ का व कशी करावी, याबद्दल सविस्तर माहिती दिली. डॉ. चैताली पवार लांडगे यांनी त्यांच्या व्याख्यानात “प्रभावी शिक्षक होण्यासाठी उपलब्ध साधने व त्यांचा योग्य उपयोग” या विषयावर मार्गदर्शन केले. सर्व उपस्थित शिक्षकांनी त्याचा लाभ घेतला आणि त्या सोबतच स्वतः च्या शंकांचे निरसन करून घेतले. डॉ. चैताली पवार लांडगे यांनी काही साधनांच्या वापराचे प्रात्यक्षिक देखील दिले. प्राचार्य डॉ. अमोल लांडगे यांनी “रसायनशास्त्र शिकवण्याचा आनंद’ या विषयावर नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून रसायनशास्त्र शिकवताना विद्यार्थ्यांचे विद्यार्जन सोईस्कर कसे करता येईल व विद्यार्थ्यांचे स्वारस्य कसे वाढवता येईल त्या बद्दल अचूक मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे प्राध्यापकांना नवीन शिक्षण पद्धती आणि तंत्रज्ञानाबद्दल माहिती मिळाली, ज्यामुळे ते त्यांच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रभावीपणे शिकवू शकतील. महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांनी सुद्धा प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. श्रद्धा शिवदे यांनी केले व कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व सहभागींचे प्रा. जावेद शेख यांच्याकडून आभार मानण्यात आले. असे जन संपर्क अधिकारी शेखर बुंदेले यांनी कळवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
संबंधित बातम्या