Home » महाराष्ट्र » *शास्त्री फार्मसी महाविद्यालय, एरंडोल येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा*

*शास्त्री फार्मसी महाविद्यालय, एरंडोल येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा*

  1. *शास्त्री फार्मसी महाविद्यालय, एरंडोल येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा*

    एरंडोल  प्रतिनिधी  – येथे शास्त्री फार्मसी महाविद्यालयात भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.

    कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. या प्रसंगी डी.डी.एस.पी. महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा. गोविंदराव अहिरराव व महात्मा फुले हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक बी. एस. चौधरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्राचार्य डॉ. विजय शास्त्री, सचिव सौ. रूपा शास्त्री व उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते.

    पाहुण्यांच्या हस्ते शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ, शुभेच्छापत्रे व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. प्रा. अहिरराव यांनी विद्यार्थी-शिक्षक परस्पर अपेक्षा या विषयावर मार्गदर्शन केले. तर  बी. एस. चौधरी सर यांनी शास्त्री दांपत्याच्या योगदानाचा गौरव करत त्यांना आधुनिक युगातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले असे संबोधले.

    प्राचार्य डॉ. शास्त्री यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत “शिक्षकांचा आदर हीच खरी शैक्षणिक परंपरा” असल्याचे सांगितले. “ध्येय गाठण्यासाठी दिव्य दृष्टी आवश्यक आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना प्रा. अनुप कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. जावेद शेख यांनी केले. विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागामुळे कार्यक्रम उत्साहात पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या