*शास्त्री महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिवसानिमित्त वाचन व पुस्तक चर्चा या विषयावर विचारमंथन व पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन…..
एरंडोल प्रतिनिधी – येथे शास्त्री फार्मसी महाविद्यालयात १५ ऑक्टोबर २०२५ रोजी वाचन प्रेरणा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ.विजय शास्त्री हे होते.यावेळी पुस्तकांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.तसेच वाचन व पुस्तक चर्चा या थिमवर विचारमंथन करण्यात आले.डाॅ.विजय शास्त्री यांनी वाचनाचे दैनंदिन जीवनातील महत्व अधोरेखित केले.
उपप्राचार्य डॉ.पराग कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.यावेळी ‘ मिसाईल मॅन ऑफ इंडिया ‘ तथा भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन होऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला.विद्यार्थ्यांना वाचनाची आवड वाढवण्यासाठी प्रोत्साहनपर प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली.आगामी काळात विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.मंगेश पाटील यांनी केले.आभारप्रदर्शन प्रा.जावेद शेख यांनी केले.ग्रंथालय विभागप्रमुख मिना मोरे, प्राध्यापक वृंद व कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.