-
एरंडोल प्रतिनिधी – जवळपास एक ते दीड वर्षे वयाच्या मादी बिबट्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर सावखेडा मराठखेडा गावानजीक मध्यरात्रीच्या वेळी घडली.सकाळी ७ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.त्यामुळे सावखेडा मराठखेडा ता.पारोळा परिसरासह एरंडोल तालुक्यातील जळू,पातरखेडा,भालगांव, नांदगाव या भागात घबराट पसरली आहे.
सावखेडा मराठखेड्याचे पोलीस पाटील संतोष पुंडलिक पाटील यांनी एरंडोल वनपरिक्षेत्र यंत्रणेला याबाबत दुरध्वनीने कळविले.त्यामुळे सहाय्यक वनसंरक्षक अमोल पंडित,वनपाल देविदास जाधव,वनपाल सतीश ठेलार व त्यांचे सहकारी घटनास्थळी सकाळी ८ वाजेच्या सुमारास दाखल झाले.यावेळी पंचनामा करण्यात आला.नंतर पशुवैद्यकीय अधिकारी पारोळा यांनी जागेवरच बिबट्याचे शवविच्छेदन केले.त्यानंतर वनपरिक्षेत्र कार्यालय, एरंडोलच्या परिसरात मृत बिबट्याची विल्हेवाट लावण्यात आली.सदर बिबट्या एक ते दीड वर्षाची मादी असल्याचे सांगण्यात आले.
बिबट्या एका रात्री २० ते ३० कि.मी.चालतो अशी माहिती वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या सुत्रांनी दिली.
