1. *एरंडोल येथे सुर्योदय जेष्ठ नागरिक संघातर्फे जेष्ठ नागरिकांचा सत्कार व व्याख्यानाचे आयोजन…..!*

    एरंडोल प्रतिनिधी  – येथील सुर्योदय जेष्ठ नागरिक संघातर्फे ३१ मार्च २०२५ रोजी मासिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने जेष्ठ नागरिकांचा सत्कार व ‘ वृध्दापकाळातील सुयोग्य नियोजन ‘ या विषयावर प्रा.सुरेश पांडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा निवृत्त तहसीलदार अरूण माळी तर प्रमुख वक्ते व मार्गदर्शक प्रा.सुरेश पांडे हे होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संस्थेचे सचिव विनायक कुलकर्णी यांनी केले.कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रा.सुरेश पांडे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.याप्रसंगी अध्यक्ष अरूण माळी, सुरेश पाटील,लोटन पाटील, सुरेश बोरनारकर, पंडित महाजन,भागवत पाटील, भिमराव पाटील, रामदास पिंगळे, मुकुंद देशपांडे, वसंत चौधरी, आधार भावसार या जेष्ठ सभासदांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
    याप्रसंगी प्रा.सुरेश पांडे यांनी आपल्या विनोदी शैलीत आंनदी जीवन जगण्याचा सल्ला दिला.आपले आरोग्य,आपला पैसा याबाबत पत्नी,मुले व अगदी विश्वासू मित्र यांच्याशी मनमोकळेपणाने चर्चा करावी.जेष्ठांनी स्वतःला म्हातारे समजू नये.मन नेहमी सकारात्मक व आनंदी असावे.तसेच संस्थेचे अध्यक्ष तथा निवृत्त तहसीलदार अरूण माळी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून ” ज्येष्ठांनी विचारल्या शिवाय कुणालाही सल्ला देऊ नये.आपला पैसा स्वतःसाठी व कुटुंबासाठी खर्च करून पैशाचे योग्य नियोजन करावे.असा मोलाचा सल्ला ज्येष्ठांना दिला.यावेळी प्रा.शिवाजीराव अहिरराव यांनी सुध्दा ज्येष्ठांना बहुमोल मार्गदर्शन केले.
    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे उपाध्यक्ष जाधवराव जगताप, संचालक पी.जी.चौधरी, वसंतराव पाटील, नामदेव पाटील, विश्वनाथ पाटील,जगन महाजन, गणेश अप्पा, भगवान महाजन,सुपडू शिंपी, सुरेश देशमुख, निंबा बडगुजर या संचालकांसह सर्व सभासद बांधवांनी सहकार्य केले.कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष अरुण माळी यांनी आभारप्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या