*७० वर्षीय महिलेने वर्षभरात लिहीले श्रीराम चरित्र मानस….!*

एरंडोल प्रतिनिधी – येथे दत्त काॅलनीमधील रहिवासी रंजना अशोक तोतला या ७० वर्षीय महिलेने घरातील सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करून फुरसतीच्या वेळेत श्रीराम चरित्र मानस या ग्रंथाचे लेखन १६ एप्रिल २०२५ रोजी पुर्ण केले.विशेष हे की अवघ्या १ वर्षात त्यांनी हा अध्यात्मिक उपक्रम राबवून आपला वेळ सत्कारणी लावला.
सन २०२२ मध्ये रंजना तोतला यांनी अवघ्या ८० दिवसात रजिस्टर मध्ये पेनाने ज्ञानेश्वरी लिहिली.तसेच सन २०२३ मध्ये संत तुकाराम महाराजांची गाथा लिहीली.या कार्यामुळे मला आत्मिक शांतता व समाधान लाभले असून संपूर्ण परिवारास सुख समृद्धीचे दिवस आले.मानवी जीवनाला अध्यात्माची जोड दिली तर परमेश्वराची कृपादृष्टी हमखास लाभते.याची प्रचिती वेळोवेळी आली आहे.या कामी त्यांना त्यांचे पती अशोक रामकिसन तोतला यांची प्रेरणा लाभली असून मुलगा शैलेश याचे प्रोत्साहन मिळाले.
वृध्दापकाळात घरातली कामे आटोपून फुरसतीचा वेळ टि व्ही वरील मालिका व मोबाईलवरचे रिल्स हे तासंतास वेळ वाया न घालवता अशा आगळ्यावेगळ्या उपक्रमात रममाण व्हावे.अशी सुजाण महिलांची अपेक्षा आहे.