- व्यसनमुक्त तरुण पिढी हेच देशाचे भविष्य योगेश महाराज धामणगावकर
एरंडोल प्रतिनिधी – तालुक्यातील भातखेडे तालुका एरंडोल येथे समस्त गावकऱ्यांच्या वतीने दिनांक 15 डिसेंबर ते 22 डिसेंबर दरम्यान. शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे गावातील ग्रामदैवत गिरणेश्वर महादेव यांच्या कृपेने व गावातील सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने भव्य आणि दिव्य स्वरूपात भगवान शंकरांची कथा म्हणजे भव्य दिव्य शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे कथेसाठी महाराष्ट्रातील नामवंत कथा वाचक लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था पाचोराचे संस्थाचालक योगेश महाराज धामणगावकर यांच्या मुखातून कथा आयोजित करण्यात आली आहे.
महाराज कथेमध्ये दररोज भगवान महादेवांच्या अनेक लीलांचे वर्णन करत असताना समाजामध्ये पसरणाऱ्या अंधश्रद्धा व विकृत मनस्थितीच्या विरोधात मत मांडत असताना बोलतात की देवाविषयी श्रद्धा असावी अंधश्रद्धा नको आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनात अनेक समस्या आहेत आणि त्या समस्यांचे निराकरण व्हावं असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असते आणि मग तो त्यासाठी भगवंताच्या कडे आपलं मागणं मांडत असतो आणि भगवान भोलेनाथ म्हणजे भोळे दैवत आहे जे प्रत्येकाच्या मनातील इच्छा पूर्ण करतात त्यासोबतच महाराज म्हणाले की आजची तरुण पिढी ही व्यसनाधीन होत चालली आहे आणि ते व्यसनाधीन होण्यामागे कारण म्हणजे मुलांची योग्य वयात लग्न न होणे तसेच शिक्षण करून सुद्धा नोकरी न मिळणे किंवा कमी वयातच प्रेमात पडणे या अशा एकना अनेक कारणामुळे मुले ही तणावात जाऊन व्यसनाधीन होत असतात त्या मुलांना समजून घेणे फार गरजेचे आहे व त्यासोबतच त्यांच्याशी संवाद साधणे ही गरजेचे आहे आणि अशा तरुणांनी वारकरी संप्रदायाची कास धरून माळकरी होऊन व्यसनमुक्त जीवन जगावे यासाठी महाराज तरुणांना कथेतून प्रेरणा देत असतात
कथेसाठी गावातून व पंचक्रोशीतून हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहत आहेत व कथेचा आनंद घेत आहेत तसेच कथेमध्ये झाकीपात्र दाखवून उपस्थित भाविकांना आनंद प्राप्त होत आहे महिला मंडळांचा विशेष प्रतिसाद या कथेसाठी प्राप्त होत आहे व गावातील भजनी मंडळ तरुण मंडळ यांचे विशेष सहकार्य कथेसाठी लावत आहे कथेसाठी सात दिवस संगीताची साथ ही गावातीलच प्रवीण माऊली भातखेडे तसेच तबलासाठी भागवत महाराज नगरदेवळा तसेच अल्केश महाराज बेलखेडा व झाकीसाठी भूषण महाराज दापोरा हे उपस्थित आहेत अजून तीन दिवस कथा बाकी असल्याकारणाने गावातील ग्रामस्थांनी परिसरातील सर्व भाविकांना आवाहन केले आहे की आपण कथेचा लाभ घ्यावा
