1. *एरंडोल शिवारात महाबीजच्या वाणांचे उत्पादनाची पहाणी*

    एरंडोल प्रतिनिधी – येथे शरद किसन पाटील महाबीज गहू फुले सात्विक (NIAW3170) आणि आकाश रामचंद्र पाटील यांच्या शेतावर फुले विक्रम या हरभरा वाणावर पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता.

    या कार्यक्रमास विभागीय व्यवस्थापक डी. डी. कन्हेड, जिल्हा व्यवस्थापक आर.सी. जोशी,मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायक धनंजय सावंत तसेच नगरसेवक गोपाल शामू पाटील, नितीन सदाशिव पाटील,प्रगतीशील शेतकरी तथा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद पाटील कासोदा व एरंडोल तालूक्यांतील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला आहे.

    कृषी क्षेत्र अधिकारी अनिता ठाकरे यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले तर आर.सी. जोशी यांनी बियाणे तयार करण्याची प्रक्रिया समजावून सांगून महाबीजचेच बियाणे खरेदी करण्याचे आव्हान केले.

    डी. डी. कान्हेड यांनी महाबीजचे जैविक खते, बुरशीनाक, केळीची रोपे याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच मंडळ कृषी अधिकारी आय. बी.पवार यांनी कृषी योजना व AI महाविस्तार अँप बद्दल उपस्थितांना माहिती दिली. कृषी क्षेत्र अधिकारी एस. पी. देवरे यांनी आभार प्रदर्शन केले.गहू बद्दल तसेच महाबीज केळी -पपईची रोपे,जैविक खते,भूमिपुत्र हिरवळीचे खतां बद्दल माहिती देण्यात आली.कार्यक्रमात शेती पिकांबाबत चर्चा,गहू व हरभरा पिक पाहणी करून सांगता झाली.

     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या

*मानधनाची रक्कम कर्मवीर अभ्यासिका व कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांसाठी देण्याचा एरंडोल न.पा.चे नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर व डॉ.गीतांजाली ठाकूर या दांपत्याचा प्रेरणादायी निर्णय………!*

*सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या मागणीला दाखवली केराची टोपली, एरंडोल येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची २१ फेब्रुवारी रोजी तातडीची बैठक……….!*