काँग्रेसच्या ओबीसी सेल तर्फे नागरिकांच्या शिधापत्रिकेच्या समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…
एरंडोल प्रतिनिधी :- येथे तालुका काँग्रेस ओबीसी सेल तर्फे नवीन शिधापत्रिका मिळाव्यात या मागणीसाठी जिल्हाधिकारी जळगाव यांना निवेदन देण्यात आले. जवळपास सहा महिन्यापासून नवीन शिधापत्रिका देण्यात आल्या नाहीत त्यामुळे बहुतांश नागरिकांना शिधापत्रिका नभावी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे असे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार एरंडोल, व पुरवठा अधिकारी एरंडोल यांना देण्यात आले आहेत.
निवेदन देताना एरंडोल तालुका काँग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष राजेंद्र चौधरी शहराध्यक्ष मुकुंद ठाकूर, शेख सांडू यांच्यासह इतर पदाधिकारी पुरुष व महिला उपस्थित होते.
बारा अंकी नंबर असलेल्या शिधापत्रिकेवर अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळावा, शिधापत्रिकेमध्ये पाच ते सहा जणांची नावे असतील तेवढ्या लोकांना धान्य मिळावे, शिधापत्रिका त्वरित मिळाव्या, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.