- *एरंडोल येथे श्रीराम प्रतिष्ठान तर्फे अध्यात्मिक प्रवचनासह आरोग्य शिबीरा अंतर्गत कॅन्सर व विविध आजारांसाठी मोफत तपासणी ……!*
![]()
![]()
एरंडोल – येथील जय श्रीराम प्रतिष्ठान तर्फे सालाबादाप्रमाणे आयोजित श्री एकविरा शिव महापुराण कथेच्या आयोजन ३० मार्च ते ६ एप्रिल २०२५ या कालावधीत केलेले आहे.अध्यात्म बरोबर आरोग्य या संकल्पनेने प्रतिष्ठानचे कार्य सुरू असते या अंतर्गतच महिलांसाठी स्तन कॅन्सर, गर्भ पिशवीचा कॅन्सर, डायबिटीस, ईसीजी, थायरॉईड अशा विविध तपासण्या करण्यात आल्या प्रतिष्ठानचे हे नवे वर्ष आहे. या शिबिरा अंतर्गत ८० नागरिकांनी आपल्या आरोग्य विषयी तपासण्या करून घेतल्या. सालापाताप्रमाणे यावर्षी देखील रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते रक्तदान शिबिरात ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले याचा जळगाव रेड प्लस रक्त पिढी चे सहकार्य लाभले.
सदर शिबिर जय श्रीराम प्रतिष्ठान, सुखकर्ता फाउंडेशन, मानवता हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आले होते. दीप प्रज्वलनाने शिवरायाची सुरुवात करण्यात आली.कॅन्सर तपासणी मानवता हॉस्पिटल नाशिक येथील डॉ. अग्रवाल, डॉ.भावसार , सुखकर्ता फाउंडेशनच्या डॉ.गीतांजली ठाकूर, डॉ नरेंद्र ठाकूर यांनी केली. थायरॉईड तपासणी कामी शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सहकार्य केले. नाका कान घसा याविषयी तपासणी आर एल हॉस्पिटल जळगाव यांच्या टीमने केले.यावेळी महिला व पुरुषांच्या विविध आजारांवर तपासणी करण्यात आल्या व त्यांना मार्गदर्शन देखील करण्यात आले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी जनसंपर्क अधिकारी राहुल सूर्यवंशी, शेखर बुंदले, ऋषिकेश महाजन,सदानंद पाटील ,जंगलु पाटील ,ज्ञानेश्वर गुजर ,अविनाश जाधव, संजय महाजन ,शैलेश शिलाहार, जितेंद्र पाटील ,ओम पाटील ,भैय्या महाजन, देव जाधव निखिल पाटील ओम शिंपी टोनी शिरवाणी प्रशांत लोहार यांनी परिश्रम घेतले
प्रतिष्ठान तर्फे 3 एप्रिल रोजी मोफत मोतीबिंदू व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन पाटील उपाध्यक्ष अमर महाजन सचिव प्रदीप फराटे यांनी केले आहे.