Home » राजकीय » एरंडोल येथे भाजपाच्या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चर्चा…….!*

एरंडोल येथे भाजपाच्या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चर्चा…….!*

  1. *एरंडोल येथे भाजपाच्या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चर्चा…….!*

    एरंडोल – येथे शासकीय विश्रामगृहावर २७ एप्रिल २०२५ रोजी तालुका भाजपची बैठक नंदू महाजन यांच्या अध्यक्षतेखाली होऊन आगामी न.पा., जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसंबधी विचारविनिमय करण्यात आला.यावेळी एरंडोल,विखरण,रिंगणगांव या मंडळ तालुका अध्यक्षपदासाठी माजी नगरसेवक योगेश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली.
    यावेळी माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी, ॲड.किशोर काळकर, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, किशोर निंबाळकर व दशरथ महाजन, माजी नगरसेवक सुनील पाटील, अशोक चौधरी,आनंदा चौधरी, निलेश परदेशी,भिका कोळी, ॲड.नितीन महाजन, सचिन विसपुते,अमरजितसिंग पाटील, प्रमोद महाजन, पिंटू राजपूत, ॲड.मधुकर देशमुख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
    यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उध्दव माळी, गोपाल भंगाळे यांनी कामकाज पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या

*एरंडोल बस आगारातील कर्मचाऱ्याचा असाही प्रामाणिकपणा…….!* लोकमत न्यूज नेटवर्क एरंडोल – येथील बस आगारातील कर्मचारी एस.टी.शेख यांना बसमध्ये सापडलेला मोबाईल त्यांनी प्रामाणिकपणा दाखवून सुरक्षा रक्षक सोनार यांच्याकडे जमा केला.१९ जुलै २०२५ रोजी आगार व्यवस्थापक निलेश बेंडकुळे यांनी सदर मोबाईल प्रवाशाला सुपुर्द केला.यावेळी स्थानक प्रमुख गोविंदा बागुल हे उपस्थित होते. १८ जुलै २०२५ रोजी १३२८ क्रमांकाच्या नाशिक – धरणगाव बसमध्ये पारोळा शेळावे फाटा प्रवास करणारे प्रवासी सुरेश रामदास नावडे यांचा विवो कंपनीचा मोबाईल बसमध्ये पडला होता.एरंडोल येथे सदर बस आगारात परत आल्यावर कर्मचारी शेख यांना मोबाईल सापडला. शेख यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणा बद्दल त्यांचे सर्व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.प्रवासी नवाडे यांनी शेख यांना धन्यवाद दिले.