- रस्त्यात खड्डे का खड्डयात रस्ता नागरिकांची चर्चा ,अधीकाऱ्यांचे दुर्लक्ष जुना कासोदा रस्ता झाला खड्डेमय …..
![]()
![]()
एरंडोल प्रतिनिधी – शहरातील जुना कासोदा रस्ता हा खेड्यातील गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्ता असल्याने त्याची दुरावस्था झाली असून अंमळनेर नाका ते कासोदा नाका या दीड किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करत जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.संबंधित विभागाने वेळीच लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांन कडून होत आहे.
तालुक्यातील खडके,कासोदा, आडगाव,उत्राण,तळई,निपाणे, गलापूर,ताडे,बाम्हणे प्रमुख गावांना जोडणारा रस्त्याची दुरावस्था झाली असून अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.संबंधित विभागाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
या मार्गावरील खेड्यातील व शहरातील नागरीकांना उद्योग, व्यवसाय,शाळा,नोकरी,रुग्णालय महाविद्यालयीन शिक्षणासाठी एरंडोल शहरात यावे लागते.अशा या खड्डेमय झालेल्या रस्तावरुन जीव मुठीत घेत जीवघेणा प्रवास करावा लागत असून रात्रीच्या वेळी खड्डय़ाचा अंदाज येत नसल्याने तसेच पावसाळ्यामुळे खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने सातत्याने अपघात होत आहेत.
अमळनेर नाका ते कासोदा नाका या 1.5 किमी अंतरा वरती खड्डे पडल्यामुळे वाहन चालवत असताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले काटेरी कुंपण व अतिक्रमण अपघातास आमंत्रण देत आहे. रस्ता वर्दळीचा असून रस्त्याने अनेकजण प्रवास करतात.नेहमीच हजारो वाहने या रस्तावरून जात येत असल्याने खड्डयामुळे व खड्ड्यात चाललेल्या पाण्यामुळे खड्ड्याचा अंदाज न आल्याने अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय रस्ता अनेक ठिकाणी अरुंद असल्यामुळे दोन वाहने खड्डय़ामुळे व्यवस्थीत पास होऊ शकत नाहीत. एक खड्डा चुकवित असताना दुसऱ्या खड्डात वाहन जावून होणारा नाहक त्रास सहन करीत जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याने नागरिक,वाहन चालक अन प्रवाशातून नाराजी दिसून येत आहे.संबंधित विभाग,लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून रस्ता दुरूस्त करण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांकडून केली जात आहे.सतत वर्दळ असलेल्या रस्त्यावर २४ तास वाहनांची मोठी वर्दळ असते अवघ्या 1.5 किलोमीटर अंतरावर जागोजागी रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे नागरिक व शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या मार्गावरून गावातील नागरीक तसेच कासोदा,आडगाव,उत्राण,निपाणे,गालापूर,ताडे,बाम्हणे गावातील नागरिकांसाठी हा मार्ग शहरात येण्यासाठी सोयीचा ठरत असल्याने सदर रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे.