*एरंडोल येथे बालवारकऱ्यांची आषाढी निमित्त शहरातून उत्साहात दिंडी सोहळा……..!*

एरंडोल प्रतिनिधी – येथे ५ जुलै २०२५ रोजी शनिवारी बालशिवाजी प्राथमिक विद्यालय,रा.ही.जाजू प्राथमिक विद्यालय,के.डी.पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल,बचपन स्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,जिजामाता माध्यमिक विद्यालय व इतर शाळांतर्फे आषाढी एकादशी निमित्त बाल वारकऱ्यांची विठू नामाचा जयघोष करीत टाळ मृदुंगाच्या गजरात चिमुरड्यांनी उत्साहात दिंड्या काढल्या.माऊलीच्या वेषातील बाल वारकरी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
बालशिवाजी शाळा व जिजामाता हायस्कूल यांच्या संयुक्त दिंडी सोहळ्याची संस्थाध्यक्ष अमित पाटील यांच्या हस्ते पालखीचे पुजन होऊन सुरूवात झाली.
या दिंडी सोहळ्यात के.डी.इंग्लीश स्कूलचे दिनानाथ पाटील,शेखर पाटील,रा.ही.जाजू शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री कुलकर्णी, संगिता वाघ, स्वप्निल बोरसे,युवराज पाटील शिक्षक व प्राथमिक शाळांमधील चिमुरडे सहभागी झाले.