- बचत गटाचे कर्जाचे पैसै बँकेतून काढून नेणाऱ्या २ महिलांकडून ४लाख ६०हजार रूपये दिवसाढवळ्या धूम स्टाईल लंपास..!*
एरंडोल प्रतिनिधी : तालुक्यातील खडकेसिम येथील महीला बचत गटाच्या अध्यक्षा जयश्री योगेश सुतार व सचिव संगीता भरत पाटील ह्या बचत गटाची कर्जाची रक्कम स्टेट बँक एरंडोल शाखेतून काढून घरी जात असताना येथे महाजन कलेक्शन नजिक समोरून आलेल्या दुचाकीवरील २अनोळखी इसमांपैकी मागे बसलेल्या भामट्याने सदर रोकड असलेली पिशवी दिवसाढवळ्या बुधवारी १६जुलै २०२५ रोजी सायंकाळी ४:१५ वा. धूम स्टाईल ने लांबवली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.
जयश्री सुतार यांच्या पायातील चप्पलेत साडी अडकल्याने ती काढण्यासाठी त्यांनी हातातील पिशवी बाजूला असलेल्या ओट्यावर ठेवली त्यावेळी चोरट्यांनी संधी साधून पैश्यांची पिशवी घेऊन पोबारा केला.एरंडोल तालुक्यातील खडकेसिम येथे सावित्री महीला बचतगट असून त्यात एकूण १०सदस्य आहेत. या बचतगटाच्या अध्यक्षा जयश्री योगेश सुतार व सचिव संगिताबाई भारत पाटील या आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या ‘उमेद, अभियानांतर्गत मे महिन्यात ६लाख रुपयांचे कर्ज सदर बचत गटास मंजूर असून १लाखाची रक्कम याआधी त्यांनी काढलेली आहे. मात्र या कर्जाचे सुमारे ४०हजारांचे २हप्ते कपात होऊन या बचत गटाच्या बँक खात्यावर ४लाख ६०हजार एवढी रक्कम शिल्लक होती.
१६जुलै २०२५ रोजी दुपारी सुतार व पाटील या दोन्ही बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांनी एरंडोल येथे स्टेट बँकेत जाऊन सदरील रक्कम धनादेशाद्वारे काढली. ती रक्कम कापडी पिशवीत ठेऊन घराकडे पायी जात असताना वरील घटना घडली.
याप्रकरणी रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पुढील तपास एरंडोल पोलिस करित आहेत.