- *एरंडोल शहर संघर्ष समितीतर्फे नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांसंदर्भात उपोषण………!*
एरंडोल प्रतिनिधी – येथील कच्च्या रस्त्यांवर मुरूम टाकणे,गटारींची नियमित सफाई, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर औषध फवारणी, स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा नियमित होणे, अंजनी नदीपात्रातील सफाई होणे आदी समस्यांसंदर्भात एरंडोल शहर संघर्ष समितीतर्फे येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर २१ जुलै २०२५ रोजी उपोषण करण्यात आले.
यावेळी शहर संघर्ष समितीचे अध्यक्ष रविंद्र लाळगे,अरूण माळी, उपाध्यक्ष नामदेव पाटील,आर.झेड.पाटील,ॲड.दिनकर पाटील, शिवाजीराव अहिरराव,पी.डी.पाटील,पी.जी.चौधरी, पत्रकार प्रवीण महाजन आदी पदाधिकारी उपस्थित होते.