-
*घरगुती विज बिलात अवाजवी व अन्यायकारक वाढ केल्याप्रकरणी एरंडोल येथे जनआक्रोश मोर्चा……..!*
एरंडोल प्रतिनिधी – येथे जवळपास दोन महिन्यांपासून अवाजवी व अन्यायकारक अशी विजबिले काढली जात असल्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.याविरोधात नागरिकांनी सोमवार २१ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता उपविभागीय कार्यकारी अभियंता महावितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.वाढीव विज बिल कमी करा,वाजवी विज बिल आकारणी करा.याबाबत मोर्च्यातील विज ग्राहकांनी घोषणा दिल्या.
महावितरण विज कंपनीचे उपविभागीय कार्यकारी अभियंता रामपाल गेडाम यांना मोर्चेकरांच्या वतीने निवेदन देण्यात आले.घरगुती विजबिलांमध्ये अचानकपणे मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.ही वाढ अन्यायकारक आहे.त्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा आर्थिक भार सोसावा लागत आहे.अवाजवी वाढीव आलेल्या विजबिलांची तपासणी करून ती रक्कम वाजवी दराने कमी करावी.संबधित विजमीटरांची फेरतपासणी करावी.विजग्राहकांसाठी सुलभ बिल दुरूस्ती प्रक्रिया सुरू करण्यात यावी.या मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
यावेळी ॲड.आकाश महाजन, ॲड.दिनकर पाटील, पत्रकार प्रवीण महाजन ॲड.प्रेमराज पाटील,प्रा.आर.एस.पाटील, ॲड.अजिंक्य काळे, ॲड.नयन आरखे, ॲड.दिपमाला खैरनार,प्रेमचंद पाटील, गजानन पाटील,किरण महाजन, धनंजय खैरनार,महेंद्र महाजन आदींची उपस्थिती होती.