Home » सामाजिक » *कै.गोटू शिवराम महाजन यांचा ८६ वा स्मृती दिन साजरा…………!*

*कै.गोटू शिवराम महाजन यांचा ८६ वा स्मृती दिन साजरा…………!*

  1. *कै.गोटू शिवराम महाजन यांचा ८६ वा स्मृती दिन साजरा…………!*

    एरंडोल प्रतिनिधी – स्व.गोटू शिवराम महाजन यांनी १०० वर्षांपूर्वी एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमिक शाळेसाठी येथे मोक्याच्या व मध्यवर्ती ठिकाणी असलेली १ एकर जागा दान केली होती.संस्थेतर्फे स्व.गोटू महाजन यांचा स्मृती दिवस संस्थाध्यक्ष शरदचंद्र काबरा यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.यावेळी स्व.गोटू महाजन यांच्या प्रतिमेचे पूजन शरदचंद्र काबरा व सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत महाजन यांच्या हस्ते होऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला.
    याप्रसंगी संस्थेतर्फे उपस्थित मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.प्रास्ताविक मुख्याध्यापक एस एस राठी यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आर.एम.कुलकर्णी यांनी केले.उपमुख्याध्यापक पी.एच.नेटके यांनी आभार प्रदर्शन केले.याप्रसंगी सुरेश देशमुख, संस्थेचे सचिव राजीव मणियार,रा.ति.काबरे विद्यालयाचे चेअरमन अनिल बिर्ला, डॉ.नितिन राठी, सहसचिव धीरज काबरे, संचालक परेश बिर्ला, सतीश परदेशी,पी.एस.नारखेडे, स्व.गोटू महाजन यांचे आप्तेष्ट व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या