-
*एरंडोल महसूल तर्फे अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी धडक मोहीम अधिक तीव्र……..!*
एरंडोल प्रतिनिधी – येथील महसूल यंत्रणेने वाळू चोरी विरोधात धडक मोहीम तीव्र केली असून दररोज गिरणा नदीपात्रातील वाळू उपसा रोखण्याकरीता अधिक पथकांची नियुक्ती केली आहे.ही पथके अहोरात्र सक्रिय होऊन कारवाई करीत असल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.
मंगळवारी १८ नोव्हेंबर २०२५ रोजी नागदुली येथे महसूल पथकाने वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दोन फिरक्या जप्त केल्या व दोरखंड, प्लास्टिक ड्रम जाळून नष्ट करण्यात आले.उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड व तहसीलदार प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी संजय साळुंखे,ग्राम महसूल अधिकारी श्रीकांत कासुंदे,बुधा गायकवाड यांच्या पथकाने सदर कारवाई केली.
