-
एरंडोल प्रतिनिधी– येथे नगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या एकूण अकरा प्रभागासाठी मतदान झाले असून यात 64 उमेदवारांनी आपले नशीब आजमावले आहे तर नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवार रिंगणात आहे तर एक प्रभाग बिनविरोध झाला असून उर्वरित प्रभागाची मतमोजणी ही दिनांक 21 डिसेंबर 2025 रविवार रोजी म्हसावद रोड लगत असलेल्या डी.डी.एस.पी जलतरण तलाव शेजारील इनडोअर स्टेडियम येथे सकाळी दहा वाजेपासून सुरू होणार आहे यात एकूण तीन फेऱ्याअखेर अंतिम निकाल स्पष्ट होणार आहे.
अकरा प्रभागासाठी एकूण 14 टेबल लावण्यात आले असून त्यात एक टेबल हा टपाली मतमोजणीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे तर उर्वरित 13 टेबलवर सकाळी दहा वाजेपासून मतमोजणी सुरुवात होणार आहे त्यात प्रभाग क्रमांक एक,दोन,तीन व चार अशा चार प्रभागाचे मतमोजणी पहिल्या फेरी अखेर घोषित होणार असून दुसऱ्या फेरीत पाच,सहा,सात व आठ तर तिसऱ्या फेरी अखेर नऊ,दहा व अकरा अशा प्रभागाचा निकाल घोषित करण्यात येणार असल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल बागुल यांनी कळविले आहे….
