-
एरंडोल प्रतिनिधी – येथील औदुंबर साहित्य रसिक मंचाचे अध्यक्ष मोहन शुक्ला यांची जळगाव शहरातील उत्तर महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रातील अग्रेसर सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या वतीने मंडळाच्या तेविसाव्या वर्धापन दिनानिमित्त २० व २१ डिसेंबर रोजी जळगावी लोकवर्गणीतून आयोजित तिसरे अखिल भारतीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी एरंडोल येथील ॲड मोहन शुक्ला यांची निवड करण्यात आली आहे. अँड.मोहन बन्सीलाल शुक्ला मागील ४३ वर्षांपासून वकिली व्यवसाय करीत असून औदुंबर साहित्य रसिक मंच एरंडोल नोंदणीकृत संस्थेचे अध्यक्ष असुन त्यांनी पूर्वी दोन दिवासीय राज्यस्तरीय साहित्य संमेलन आयोजन डॉ श्रीपाल सबनीस उदघाटक, उत्तमजी कांबळे साहित्य संमेलनध्यक्ष विविध कवी संमेलन व परिसंवाद आयोजन रिक्रीशन टेनिस क्लब एरंडोल चे मागील दहा वर्षांपासून अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत त्यांनी धरणगाव वकील संघांचे माजी अध्यक्ष पद देखील भूषविले आहे.
अँड. मोहन शुक्ला यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
