*एरंडोल नगरपालिकेत ५ नवनिर्वाचित नगरसेवक अविवाहित……….!*
एरंडोल प्रतिनिधी – येथे नगरपालिकेत नवनिर्वाचित नगरसेवकांपैकी ५ युवा नगरसेवक चक्क अविवाहित आहेत.विशेष हे की त्यांचा वयोगट २३ वर्षांपासून ३२ वर्षादरम्यान आहे.या पंचवार्षिकमध्ये विवाहाआधी मतदारांनी त्यांना नगरसेवक म्हणून पसंती दिली.आता ते बोहल्यावर कधी चढणार? यांची प्रतिक्षा केली जात आहे.
एरंडोल नगरपालिकेची जवळपास ९ वर्षांनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत नवनिर्वाचित नगरसेवकांमध्ये १३ महिला व १० पुरूष आहेत.त्या १० पुरूषांमध्ये निम्मे नगरसेवक युवक असून शुभमंगलाच्या प्रतिक्षेत आहेत.एकंदरीत यावेळच्या नगरसेवकांची टीम तरूणाईची आहे.
अविवाहित नगरसेवक पुढील प्रमाणे आहेत.१)प्रशांत दिलीप महाजन प्रभाग क्रमांक ४अ,वय ३० वर्षे २) कृष्णा प्रल्हाद ओतारी प्रभाग क्रमांक ७ब,वय २७ वर्षे ३) रविंद्र संतोष महाजन प्रभाग क्रमांक १ब,वय २३ वर्षे ४) अमोल किशोर तंबोली प्रभाग क्रमांक २ब,वय ३२ वर्षे ५)रितेश कैलास चौधरी प्रभाग क्रमांक ९अ ,वय २३ वर्षे यामध्ये रविंद्र महाजन व रितेश चौधरी हे दोन्ही अवघे २३ वर्षे वयाचे आहेत.
