-
*एरंडोल येथे घराची दुरुस्ती करताना अचानक पडले भुयार……..!*
एरंडोल प्रतिनिधी – येथे मारूती मढी परिसरात राहत्या घराची दुरुस्ती होत असतांना अचानक सुमारे २५ फुट खोल व ३ ते ४ फुट व्यासाचे भुयार पडल्याची घटना गुरूवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.या घटनेचे वृत्त परिसरात पसरताच बघ्यांनी एकच गर्दी केली.सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.शाम बोरसे यांच्या घरात जुनी फरशी काढून नवीन फरशी बसवत असतांना अचानक भुयार पडले.बोरसे परिवाराने भुयार पुर्णपणे बुजण्याचा प्रयत्न केला असता ते अपयशी ठरले.खालच्या भागात भुयार रूंद व खोल असल्याचा अंदाज आहे.
एरंडोल हे पुरातन शहर असून येथे अचानक भुयारे पडल्याच्या घटना अनेक वेळा घडल्या आहेत.पुर्वीच्या काळी ही धान्याची कोठारे असावीत असा बुजुर्गाचा अंदाज आहे.
