- *एरंडोल रन मॅरेथॉन स्पर्धेत धावले २ हजार युवक युवती……..!*
*१० कि.मी.धावण्याच्या स्पर्धेत निपाण्याचा प्रशांत जाधव प्रथम क्रमांकाचा मानकरी…….!*
एरंडोल प्रतिनिधी – येथे रा.ति.काबरे विद्यालयात ११ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ५.३० वाजेपासून सकाळी ९ वाजे दरम्यान एरंडोल रन मॅरेथॉन स्पर्धेत जवळपास २ हजार युवक, युवती,मुले,मुली, महिला व पुरुष यांनी सहभाग नोंदविला.येथील मैत्री सेवा फाऊंडेशन या उपक्रमशील संस्थेतर्फे गेल्या वर्षाच्या अभुतपुर्व प्रतिसादानंतर यंदाही ‘ एक तास आरोग्यासाठी ‘ या संकल्पने अंतर्गत रन मॅरेथॉन चे आयोजन करण्यात आले.ऐन थंडीच्या दिवसात धावणे हे सर्व वयोगटातील नागरिकांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरत असल्याने या उपक्रमास यंदाही भरघोस प्रतिसाद मिळाला.१० कि.मी.धावण्याच्या स्पर्धेत प्रशांत जाधव ( निपाणे) हा तालुक्यातील युवक प्रथम क्रमांकाचा विजेता ठरला.तर द्वितीय क्रमांक तेजस ठाकूर व तृतीय क्रमांक मोहित महाजन हे विजेते ठरले.
स्पर्धेतील इतर गटातील विजेते पुढील प्रमाणे.
५ कि.मी.पुरूष गट
प्रथम – अमर महाजन
द्वितीय – विठ्ठल मराठे
तृतीय – निलेश बाहेती
३ कि.मी.पुरूष गट
प्रथम – सनी कोळी
द्वितीय – ओम पाटील
तृतीय – प्रथमेश जगताप
५ कि.मी.महिला गट
प्रथम – पायल पवार
द्वितीय – लक्ष्मी महाजन
तृतीय – पुजा पाटील
३ कि.मी.महिला गट ( वय १० ते १६ वर्षे)
प्रथम – जान्हवी रोझोदे
द्वितीय – मेघना पाटील
तृतीय – हर्षदा पवार
पाचही गटातील विजेत्या स्पर्धकांना एरंडोल नगरीचे नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, प्रायोजक तथा युवा उद्योजक प्रसाद काबरा व प्रायोजक ॲड.ओम त्रिवेदी यांच्या हस्ते प्रथम क्रमांक ५ हजार १०० रू., द्वितीय क्रमांक ३ हजार १०० रू.तृतीय क्रमांक २ हजार १०० रू.इत्यादी रूपयांचे पारितोषिकाचे धनादेश वितरित करण्यात आले.
यावेळी मैत्री सेवा फाऊंडेशनचे पदाधिकारी सागर महाजन,पियुष चौधरी, पंकज पाटील, तुषार महाजन, निखिल शेंडे, निलेश बाकळे, हेमंत पाटील,शुभम महाजन, मनोज महाजन, संतोष जयस्वाल, ज्ञानेश्वर महाजन,विनीत पाटील,चेतन शिंपी,प्रितेश पाटील यांच्यासह अनेक स्वयंसेवक व हितचिंतकांनी विशेष परिश्रम घेतले.पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला.
