Home » सामाजिक » एरंडोलला राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ जयंती उत्साहात साजरी दिमाखदार कार्यक्रमात शहरातील उत्कृष्ट कार्य करणार्‍या महिलांचा सत्कार

एरंडोलला राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ जयंती उत्साहात साजरी दिमाखदार कार्यक्रमात शहरातील उत्कृष्ट कार्य करणार्‍या महिलांचा सत्कार

  1. एरंडोलला राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ जयंती उत्साहात साजरी
    दिमाखदार कार्यक्रमात शहरातील उत्कृष्ट कार्य करणार्‍या महिलांचा सत्कार

  2. एरंडोल (प्रतिनिधी) – येथील ओमनगरमध्ये राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांची 428 वी जयंती राजमाता जिजाऊ महिला मंडळ आणि जिजाऊ ब्रिगेडतर्फे उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार अमोलदादा पाटील यांच्या पत्नी मृणाली अमोल पाटील होत्या. त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
    याप्रसंगी उत्कृष्ट कार्य करणार्‍या महिलांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवविका डॉ. गितांजली नरेंद्र ठाकूर, शोभा जगदीश साळी, शबनम जावेद मुजावर, सोनल विजय पाटील, आशा गजानन पाटील या महिलांचा जिजाऊंचे स्मृतीचिन्ह आणि पुस्तक देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी राजमाता जिजाऊंबद्दल उपस्थितांसमोर मनोगत व्यक्त केले.
    याप्रसंगी नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष ,युवा सेना जिल्हाध्यक्ष प्रा. मनोज पाटील, माजी नगराध्यक्ष राजेंद्र आबा चौधरी, संभाजी आबा पाटील, रमेशअण्णा महाजन, ज्ञानेश्वर आमले, एस. आर. बापू पाटील, प्रा. आर. एस. पाटील, भैय्या पाटील, रोकडे सर, प्रमोदअण्णा पाटील, नगरसेवक मयुर महाजन, अनिल महाजन, रूपेश माळी, रवींद्र महाजन ,रवींद्र महाजन, कृष्णा ओतारी ,अमोल , नयुम खान पठाण ,नाना साळुंखे, रविंद्र लाळगे, हिम्मत पाटील सर गजानन पाटील (पोलिस), गजानन पाटील, शिंपी सर, निलेश चौधरी, भास्कर चौधरी, कैलास कुवर, सचिन पाटील, विजय पाटील, विवेक पाटील, टीनु ठाकूर, अजय पाटील, फरकांडे येथील ह.भ.प. दिनेश महाराज, गणेश बडगुजर, नामदेवराव पाटील, दिपक पाटील, अभी पाटील, यशवंत पाटील, रघुवंशी गुरूजी, महानंदाताई पाटील, उपनगराध्यक्ष सुनीताताई माळी , नगरसेविका संकल्पना ताई पाटील, जिजाबाई पाटील, शबानाबी मुजावर , नजमा बी कागजी ,डॉ. गितांजली ठाकूर, अध्यक्ष सत्यभामा पाटील , कमलताई पाटील , मंकरणा बाई चौधरी ,आरती महाजन, छाया दाभाडे, शारदा मराठे, पल्लवी पाटील, आशा पाटील, पुनम सावंत, मीना मानुधने, सोनल पाटील, शोभा साळी, रेवती पाटील आदी उपस्थित होते.
    कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदनेने करण्यात आली. तळई माध्यमिक विद्यार्थीनींनी नृत्याद्वारे मानवंदना देवून जिजाऊ वंदना सादर केली. प्रास्ताविक वैशाली पाटील, सूत्रसंचलन राकेश पाटील सर, तर आभार स्वप्निल सावंत यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रा. मनोज भाऊ (पैलवान) यांचे विशेष सहकार्य व अनमोल मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वप्निल सावंत, पोलीस गजानन पाटील, अजय पाटील, पंकज पाटील, स्वप्निल बोरसे, गोटू पाटील, हेमंत पाटील, टिनू ठाकूर, यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
संबंधित बातम्या