-
*एरंडोल नगरपालिकेच्या विविध समित्यांची बिनविरोध निवड……..!*
एरंडोल प्रतिनिधी – येथे नगरपालिकेची विशेष सभा १५ जानेवारी २०२६ रोजी पिठासन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली होऊन विविध समित्यांची निवड करण्याची प्रक्रिया पार पडली.विशेष हे की सर्व विषय समित्यांची निवड बिनविरोध करण्यात आली.यावेळी नगराध्यक्ष डॉ.नरेंद्र धुडकू ठाकूर, उपाध्यक्ष सुनिता रूपेश माळी, मुख्याधिकारी अमोल बागुल व नगरसेवक उपस्थित होते.
निवड करण्यात आलेल्या विविध समित्या पुढील प्रमाणे.
१) सार्वजनिक बांधकाम समिती – पाटील कमल गोपाल, दाभाडे छाया आनंद, पाटील कल्पना मनोज,तंबोली अमोल किशोर, डॉ.ठाकूर गितांजली नरेंद्र, सय्यद इम्रानअली जाफरअली
२) शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती – पाटील सत्यभामाबाई माधव, पाटील मनोज नथ्थू, पाटील कल्पना मनोज, पाटील जिजाबाई वसंत, महाजन रविंद्र संतोष.सय्यद इम्रानअली जाफरअली.
३) स्वच्छता,वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती – मराठे शारदा अतुल, पाटील मनोज नथ्थू, पठाण नय्यमखां दलशेरखां,ओतारी कृष्णा प्रल्हाद, गुर्जर भारती मनोज, सय्यद शबानाबी नुरूद्दीन.
४) पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण समिती – चौधरी मनकरनाबाई चैत्राम, पाटील मनोज नथ्थू, महाजन अनिल केशव, महाजन आरती अतूल, चौधरी नितेश कैलास,कागजी नजमाबी सईद.
५) नियोजन आणि विकास समिती – माळी सुनिता रूपेश ( उपाध्यक्षा), पाटील मनोज नथ्थू, महाजन अनिल केशव, महाजन प्रशांत दिलीप, चौधरी नितेश कैलास, सय्यद शबानाबी नुरूद्दीन.
६) महिला व बाल कल्याण समिती – देवरे पौर्णिमा महेश, पाटील कल्पना मनोज, दाभाडे छाया आनंद, महाजन आरती अतूल, डॉ.ठाकूर गितांजली नरेंद्र,कागजी नजमाबी सईद.
दरम्यान सदर समित्यांच्या सभापती पदाची निवड २१ जानेवारी २०२६ रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले.समित्या निवड प्रक्रिया पार पाडण्याकामी न.पा.चे प्रशासकीय अधिकारी हितेश जोगी, कार्यालय अधीक्षक एस.आर.ठाकूर, महेंद्र पाटील,आर.के.पाटील,शरद राजपूत,इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
