Home » विचारमंच » शेती परवडत नाही म्हणणाऱ्या शेतकऱ्यांन समोर एक आदर्श ठेवत शेतक-यांने कासोद्यातील आपल्या शेताच्या बांधावर जगवले ३५० आंब्याचे झाडे

शेती परवडत नाही म्हणणाऱ्या शेतकऱ्यांन समोर एक आदर्श ठेवत शेतक-यांने कासोद्यातील  आपल्या शेताच्या बांधावर जगवले ३५० आंब्याचे झाडे

  1. शेती परवडत नाही म्हणणाऱ्या शेतकऱ्यांन समोर एक आदर्श ठेवत शेतक-यांने कासोद्यातील  आपल्या शेताच्या बांधावर जगवले ३५० आंब्याचे झाडे

    कासोदा ता.एरंडोल प्रतिनिधी – येथील शेतक-यांने आपल्या ८ एकरच्या शेतात नव्हे तर चक्क बांधावर ३५० आंब्याचे रोपं जगवले असून यंदा यातील काही झाडांना छान पैकी मोहोर देखिल आला आहे, शेतातील उत्पन्नासोबतच बांधावर देखिल लाखो रुपयांची कमाई भविष्यात होईल,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

    येथील हरी राक्षे हा मेहनती शेतकरी वडिलोपार्जित जमिनीत वेगवेगळे प्रयोग करीत असतो,या आधी ५ एकर जमिनीत त्यांनी सिताफळ लावले होते,काही वर्षे चांगले उत्पन्न आले,परंतू गेल्या २/३ वर्षांपासून सिताफळावर मिलीबग या रोगाने आक्रमण केले आहे, त्यामुळे बाजारात या फळांची मागणी घटली होती, ही बाग विकली जात नव्हती, त्यामुळे त्यांनी सर्व झाडे उपटून फेकून दिली आहेत,५एकरातील सिताफळ बाग उपटून फेकल्यामुळे खचून न जाता पून्हा नव्या उम्मेदीने राक्षे कामाला लागलेत.

    त्यांनी शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेऊन ठिबकसंच,गोठा,गाई-म्हशी,कडबाकुट्टीमशीन,मिल्कमशीन,सोलरसंच बसवून आधुनिक पद्धतीने शेती व पूरक जोडधंदा सुरु केला आहे.

    शेतात ठिबकसंच असल्याने त्याचा योग्य वापर करुन बांधावर लावलेल्या रोपांसाठी पाणी पुरवठ्याची नळीतून दररोज पाणी मिळेल अशी व्यवस्था केली आहे,त्यामुळे ही रोपं आता चांगली बहरली असून यंदा काही झाडांना मोहर देखिल आलेला आहे.

    अनेक शेतक-यांच्या शेतात मोठमोठे बांध गवत उगवून पडून असतात, तर काही शेतक-यांत बांधावरुन मोठमोठे वाद होतांना आपण पहात असतो,शेतातील बांधावर शून्य उत्पादन असते,पण या बुद्धीमान शेतक-यांने बांधाचा अत्यंत प्रभावी उपयोग करुन आंब्याच्या रोपांची लागवड केली आहे,ही रोपं नर्सरीतून आणून लावली नसून आंब्याची कोय गोळा करुन घरीच जमिनीत उगवली, तिला घरीच कलम करुन ही सर्व रोपं फुकटात तयार केलेली आहेत.

    या शेतक-याच्या शेता जवळून बी.वन (B1)ही पाटाची चारी जाते, या चारीच्या आजूबाजूला देखिल ही रोपं लावली आहेत, मलाच उत्पादन मिळावे,हा हेतू नसून या झाडांची फळे कुणी तरी खाणार या मोठ्या विचारातून ही रोप लावली व तेथे देखिल ठिबकनळ्या टाकण्यात आल्या आहेत.

    या शेतक-यांने गाई पाळल्या असून दूध काढण्यासाठी मिल्कमशीन आणले आहे, सर्वसाधारणपणे शेतकरी हातानेच दूध काढतात,पण हा अवलिया शेतकरी याकामी देखिल आधुनिक झालेला पहावयांस मिळतो.

    रोपं जगवतांना ज्याकाळी ठिबकसंच नव्हता,तेंव्हा यांनी प्रत्येक झाडाजवळ एक मोठे मडके(मातीचा माठ)ठेऊन त्यात ८दिवसांत एकदा पाणी भरुन ती रोपं जगवण्याचे प्रचंड मेहनतीचे काम देखिल केले आहे,यासाठी खुप श्रम व वेळ वाया जात असला तरी जिद्द होती,पण आता ठिबकच्या नळ्यांमुळे हे काम सोप्पे व मुबलक पाणी देणेचे झाल्याने रोपं चांगली बहरली आहेत.ही झाडं पहाण्यासाठी आता परिसरांतील शेतकरी या शेतीला भेंट देण्यासाठी येऊ लागली आहे.

    आंब्याच्या रोपां सोबतच त्यांच्या बांधावर चिंच, जांभुळ, कविट,पपई,बोर अशा प्रकारची वेगवेगळी फळझाडे देखिल आहेत.

    हा शेतकरी स्वतःचे छंद देखिल जोपासतो,तो उत्तम गायक आहे,फेसबुकवर त्याचे मोठ्या संख्येने चाहते आहेत,त्यांना चांगल्या आवाजाची देणगी लाभली आहे,त्यामुळे ते दररोज वेगवेगळी सिने गीते शोशलमिडीयात शेअर करीत असतात,लोकांना ती भावतात.

    स्वतः शिक्षण घेतले नसले तरी दोन्ही मुलांच्या उच्चशिक्षणा साठी शेती उत्पनातून त्यांची धडपड सुरु आहे.

    अपयशामुळे न डगमगता आपण जे काम करतो, त्यासाठी प्रचंड मेहनत करण्याची मानसिकता, चिकाटी व सोबत आधुनिकतेची कास धरली तर यश हमखास मिळते,हे अनुभवातून शिकलो आहे.—हरी भीवा राक्षे कासोदा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
संबंधित बातम्या