13 Year old Boy Rape in Mumbai: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असताना राज्यात आता मुलेही सुरक्षित नसल्याचे प्रकरण समोर आले आहे. मुंबईच्या मुलंड परिसरात १३ वर्षीय मुलावर आठ महिने अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला बेड्या ठोकल्या आहेत. पीडित मुलगा आणि आरोपी एकमेकांसोबत वारंवार परिसरातील सार्वजनिक शौचालयात असल्याने शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीला त्यांच्यावर संशय आला. त्याने एकेदिवशी दोघांचा पाठलाग केला असता आरोपी मुलावर अत्याचार करत असल्याचे उघड झाले.