एरंडोल प्रतिनिधी – एरंडोल तालुका औषध विक्रेता संघटनेतर्फे जागतिक फार्मसिस्ट दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औषध विक्रेता संघटनेचे तालुकाध्यक्ष सतिश पाटील हे होते.यावेळी मिना चौधरी, जयश्री पाटील, वंदना कुलकर्णी या महिला औषध विक्रेत्या व जेष्ठ औषध विक्रेते कैलास न्याती, किशोर भक्कड, कैलास समदाणी, राजेंद्र महाजन, नितीन बिर्ला, योगेश काबरा, नितीन शिंपी,उदय पाटील, रविंद्र सोनार, भगवान पाटील, गुणवंत पाटील यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी नागरिकांचे हित लक्षात घेऊन विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच घर व परिसरात स्वच्छता कशी राखावी यासंबंधी जनजागृती अभियान राबविण्याचे ठरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल भक्कड, सुत्रसंचलन संदीप पाटील व आभारप्रदर्शन सतिश पाटील यांनी केले.कैलास न्याती, जयश्री पाटील, मनोहर पाटील, अनिकेत पाठक यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सचिव गुणवंत पाटील, कैलास न्याती, किशोर भक्कड, योगेश बियाणी,नाझिम बोहरी, भुषण पाटील, ललित पाटील, महेश पाटील,सागर पाटील, चेतन पाटील, दिपक शेंडे, प्रविण शिरोळे आदी औषध विक्रेते उपस्थित होते.