एरंडोल प्रतिनिधी — चाळीसगाव येथे झालेल्या 20 राज्यस्तरीय कुमार गट स्पर्धेत एरंडोलचा राम पाटील व कल्पेश पाटील व दादू पाटील यानी ग्रीक रोमन व फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत क्रमांक मिळून त्याची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली व साई मनोज पाटील यांने उपविजेतेपद मिळविले
एरंडोल शहरातील नामांकित मल्ल नथू पैलवान यांच्या कुस्तीचा वारसा राम पाटील ,कल्पेश पाटील ,दादु पाटील साई पाटील यानी पुढे चालू ठेवला आहे ते प्रा. मनोज पहेलवान जिल्हाप्रमुख युवा सेना यांच्या पुतण्या आहे चाळीसगाव येथे नुकताच झालेल्या कुमार गट केसरी स्पर्धेत एरंडोल येथील राम पाटील याने 44,70,72 किलो वजनी गटात बाजी मारत प्रथम क्रमांक मिळवला त्याची निवड राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी झालेली आहे त्याच्या या निवडीबद्दल शहरात त्याचे सर्व परी कौतुक होत आहे तो कुस्तीचे धडे गुरु हनुमान कुस्तीगीर संस्थेत घेत असून कोच भानुदास आरखे यांच्याकडून मोलाचे मार्गदर्शन घेत आहे कल्पेश पाटील व दादु पहेलवान हे जयगुरू व्यायम शाळेत कुस्ती चे प्रशिक्षण घेतात कोच म्हणून गोटू पाटील, योगराज महाजन,सोनु पहेलवान यांच्या कडून प्रशिक्षण घेतात
या यशाबद्दल त्याचे अभिनंदनं तालुक्याचे आमदार चिमणराव पाटील, युवा नेतृत्व अमोल दादा पाटील, किशोर काळकर, ज्ञानेश्वर आमले, प्रा. मनोज पाटील, आशिर्वाद पाटील, नगरसेवक बबलू पैलवान, बाळा पैलवान, आनंद दाभाडे, अमोल तंबोली, यांनी त्याचे स्वागत व अभिनंदन केले