- अंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत श्री व्ही एस नाईक महाविद्यालयाचा पुरुष संघ उपविजय महिला संघ तिसऱ्या स्थाना व
प्रतिनिधी जळगाव — येथे बबन बाहेती महाविद्यालय जळगाव ,होणाऱ्या अंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यात पुरुष संघामध्ये एकूण 19 संघ तर महिलांमध्ये एकूण 8 संघांनी सहभाग नोंदविला होता . या स्पर्धेत रावेर येथील श्री व्ही एस नाईक महाविद्यालय यांच्या पुरुष व महिला संघाने सहभाग नोंदवून आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर पुरुष गटाने फायनल पेरी गाठून उपविजेता ठरला तर महिला खेळाडूंनी या तृतीय क्रमांक मिळविला दोन्ही संघाला संस्थेचे अध्यक्ष हेमंतभाऊ नाईक संस्थेचे प्रतीक नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अनिल पाटील महाविद्यालयाचे उपप्राचार्य तसेच क्रीडा समन्वयक प्रा एस यु पाटील दुसरे उपप्राचार्य प्रा संदीप धापसे क्रीडा संचालक डॉ उमेश पाटील नेक समन्वयक प्रा एच चिंचोले , प्रा व्ही डी पाटील , प्रा निता जाधव , प्रा राजकुंदन , प्रा शिरीष पाटील क्रीडा समीती सदस्य प्रा चतुर गाडे , प्रा नरेद्र घुले , सर्व प्राध्यापक रुंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या