- एरंडोल प्रतिनिधी – येथे ३ ऑक्टोबर २०२४ रोजी गुरूवारी १९ सार्वजनिक मंडळांनी माता दुर्गादेवीची प्रतिष्ठापना स्थापना करण्यात आली.तर ग्रामीण एरंडोल पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील ३० मंडळांनी दुर्गादेवीची स्थापना केली.एरंडोल येथे ज्ञानदीप मित्र मंडळ,क्रांती दुर्गा मंडळ,जय भवानी मंडळ,जय काली मंडळ, जयहिंद मित्र मंडळ आदी सार्वजनिक मंडळांनी वाजत गाजत मिरवणूका काढून दुर्गादेवीची प्रतिष्ठापना केली.पोलीस निरिक्षक सतीश गोराडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
दरम्यान बुधवार दरवाजा पासून भगव्या चौकापर्यंत मेन रोडवर पुजेचे साहित्य विक्रीची दुकाने थाटण्यात आली होती.एकंदरीत घटस्थापनेमुळे मेनरोडला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले.नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील दुर्गादेवीच्या मंदिरांवर आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.