- एरंडोल प्रतिनिधी – मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजने अंतर्गत येथील ४३ जेष्ठ नागरिक भारत गौरव पर्यटक ट्रेन द्वारे अयोध्या येथे प्रभु रामचंद्रांच्या दर्शनासाठी ३ सप्टेंबर २०२४ रोजी जळगाव येथून रवाना झाले.४ ऑक्टोबर २०२४ रोजी सदर जेष्ठ नागरिक एरंडोल येथे परत आले.
- एरंडोल येथे परतल्यावर सदर जेष्ठ नागरिकाचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले.दरम्यान प्रवासात त्यांनी भजने गाऊन प्रवासाचा आनंद घेतला.अयोध्येला प्रभु रामचंद्रांच्या दर्शनाचा लाभ मिळाल्यामुळे आम्ही कृत्यकृत झालो.अशी प्रतिक्रिया भाविकांनी व्यक्त केली.