Home » सत्ताकारण » एरंडोल विधानसभा मतदारसंघातील उबाठा शिवसेना गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट शिवसेना पक्षप्रमुखांची……..!

एरंडोल विधानसभा मतदारसंघातील उबाठा शिवसेना गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट शिवसेना पक्षप्रमुखांची……..!

 

एरंडोल प्रतिनिधी – एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघातील उबाठा शिवसेना गटाचे इच्छुक उमेदवार डॉ.हर्षल माने व नानाभाऊ महाजन या नेत्यांसह इतर पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षातर्फे उमेदवारी संदर्भात बंद दाराआड चर्चा झाली.एरंडोल मतदार संघात १९९० पासून ही जागा लढवत असून ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या पक्षाचे संघटन देखील बळकट व मजबूत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुखांना सांगितले.ही जागा आपल्या पक्षातर्फे लढविण्यासाठी यावेळी आदेश देण्यात आला.
विधानसभा निवडणुक लढवण्यासाठी डॉ.हर्षल माने व नानाभाऊ महाजन हे दोनच उमेदवार इच्छुक असल्याने या दोघांपैकी एका इच्छुक उमेदवाराच्या नावाची घोषणा योग्य वेळी करण्यात येईल.असे सांगण्यात आले असता उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी व इच्छुक उमेदवारांनी ह्या सुचनेस मान्यता दिली.पक्षप्रमुखांच्या आदेशाप्रमाणे जो उमेदवार देण्यात येईल त्याच्यासाठी सर्व जण एकदिलाने काम करू अशी ग्वाही देण्यात आली.
या बैठकीत करण पवार,जिल्हा प्रमुख डॉ.हर्षल माने, उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन, माजी जि.प.सदस्य नानाभाऊ महाजन, एरंडोल तालुका प्रमुख रविंद्र चौधरी, पारोळा तालुका प्रमुख आर.बी.पाटील, एरंडोल शहरप्रमुख प्रमोद महाजन, पारोळा शहरप्रमुख अशोक मराठे इ.पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
संबंधित बातम्या